IMD monsoon update Sakal
पुणे

Monsoon Update : ऑगस्ट महिन्यात मॉन्सूनची स्थिती कशी असणार? IMD कडून अपडेट

ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मान्सूनचा जोर कसा असणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील बहुतांश भागात सध्या मॉन्‍सूनच्या पावसाने विश्रांती घेतली असून पुण्यातही ‘मॉन्सून ब्रेक’चे चित्र पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यातील स्थिती पाहता, यंदा पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ६५ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीतून स्‍पष्ट झाले आहे. तसेच, पुढील आठवडाभर पावसाची स्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात १ ते १२ ऑगस्टमध्ये १२७.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ ४४.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात ६२४.५ मिलिमीटर पावसाची नोंद होते. त्यात यंदा ५७०.२ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. मॉन्‍सूनच्या पावसाने सध्या उघडीप दिली असून ऑगस्ट महिन्यात पुणे व नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हवामानाची सद्यःस्थिती ः
- सध्‍या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे (हिमालयाच्या पायथ्याकडे) कायम
- सिक्कीम ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा कायम
- कर्नाटक ते कोमोरीनपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय
- पावसासाठी राज्यात पोषक स्थितीची अभाव
- राज्यातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता कमीच

मॉन्सून हंगामातील एकूण स्थिती ः
- मॉन्सून हंगामातील १ जून ते १२ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा २ टक्के कमी पाऊस
- बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी व त्यापेक्षा कमी पावसाची स्थिती
- जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९ टक्के कमी पाऊस

सरासरीपेक्षा २० ते सुमारे ५० टक्के कमी पावसाची नोंद झालेले जिल्हे ः
- सांगली, नगर, सातारा, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, परभणी

विभागनिहाय पावसाची स्थिती (१ जून ते १२ ऑगस्टपर्यंत) ः
विभाग ः सरासरी पडणारा पाऊस ः प्रत्यक्षात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
मध्य महाराष्ट्र ः ४८२ ः ४१८
मराठवाडा ः ३७४.१ ः ३३९.२
विदर्भ ः ६११.८ ः ५६६.५
कोकण आणि गोवा ः २१२२.३ ः २४६३.५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Shreyas Talpade : "मी अक्षयचा आयुष्यभर ऋणी " ; हार्टअटॅकनंतर अक्षयकुमारने श्रेयसला अशी केली मदत

SCROLL FOR NEXT