पुणे : अनिवासी भारतीय पालक संघटना पुणे (नृपो) यांचा २९वा स्थापना दिनानिमित्ताने स्वामी निवास वृद्धाश्रम संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका गौरी धुमाळ यांचा कै. न्या. ना. ल. अभ्यंकर पुरस्कार आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्काराचे वितरण त्री दलचे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते झाले. तसेच ‘नृपो’चे संस्थापक न्या. अभ्यंकर यांच्या जीवनावर भालचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेले ‘महान तपस्व’ या पुस्तिकेचे प्रकाशन देसाई यांच्या हस्ते झाले. ‘नृपो’चे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा बापट यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद शहा, संस्थेचे सदस्य दिवाकर लेले, पद्मा परांजपे, वैदेही कुलकर्णी, शांता दिवाण, संजीव बेंद्रे, संजीव आगाशे, अशोक देशपांडे, वासुदेव केनच आदी उपस्थित होते. विद्याधर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र माहुलकर यांनी आभार प्रदर्शन केले.
गौरी-गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन
पुणे : प्रियदर्शिनी वूमन्स फोरम व बिटीया फाउंडेशनतर्फे काँग्रेस भवनच्या पटांगणात भरविण्यात आलेल्या गौरी-गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन नुकतेच झाले. महिला प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा संध्या सव्वलाखे, आमदार संग्राम थोपटे, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, देवानंद पवार, डॉ. संजय चोरडिया, अभिनेत्री स्मिता गोंदकर, आरती शिंदे, राहुल जगताप, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब दांडेकर, रफिक शेख, भानुप्रताप बर्गे, लता राजगुरू, वैशाली मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी केले. जत्रेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वाती ते मूर्तीपर्यंत सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. जत्रा १७ सप्टेंबरपर्यंत खुली असणार आहे.
‘इशरे’तर्फे परिषदेचे आयोजन
पुणे, ता. ११ : वाढते कार्बनीकरण कमी करण्यास पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरण्यासाठी सर्व स्तरात जागृती घडवून आणण्याचा निर्धार इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग, एअर कंडिशनिंग इंजिनिअर्सच्या (इशरे) परिषदेत करण्यात आला. ‘चिलर कॉन्क्लेव्ह ॲण्ड हिट पंप कार्निव्हल-२०२३’ या एक दिवसीय परिषदेमध्ये तंत्रज्ञ, तज्ज्ञ आणि अभियंत्यांनी एकत्र येऊन चर्चा केली. संयोजक आशुतोष जोशी, सहसंयोजक चेतन ठाकूर यांनी स्वागत केले. के. राघवन, डॉ. आनंद बाबू, डॉ. नितीन देवधर, सुभाष खनाडे, नंदकिशोर कोतकर उपस्थित होते. चर्चासत्रात जयंत देशपांडे, अयाझ काझी, सागर मुनीश्वर, संदीप आनंद, गजानन खोत, राहुल फणसळकर यांनी मार्गदर्शन केले.
तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे शिष्यवृत्तीवाटप
पुणे : तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे शिष्यवृत्तीवाटप कार्यक्रम झाला. यामध्ये आर्थिक परिस्थिती सक्षम नसलेल्या आणि दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी ‘सेंटर फॉर सिटीझन सायन्स’ या संस्थेला समाजाभिमुख कार्याबद्दल मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील देव यांनी दिली.
‘रोटरी मिलेट जत्रा २०२३’
पुणे : रोटरी क्लब कॅम्प व राज्य कृषी विभाग यांच्या वतीने अल्पबचत भवन येथे एकदीवसीय ‘रोटरी मिलेट जत्रा २०२३’ भरविण्यात आली होती. यामध्ये व्यवसाय, आरोग्य, भरडधान्य, पाककला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी कृषी संचालक विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कृषी उपसंचालक शिवकुमार सदाफुले, मंजू फडके, शीतल शहा, प्रदीप खेडकर उपस्थित होते.
‘स-समिक्षेतला’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : दिशा प्रकाशनतर्फे माणिकबाग येथील ऋतुपर्ण हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कवयित्री प्रा. ज्योती देसाई लिखित ‘स-समिक्षेतला’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी साहित्यिक राहुल भोसले, प्रकाशक सुरेंद्र गोगटे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.