पुणे, ता. १५ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देण्यात येणारा पर्यावरण भूषण पुरस्कार यंदा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. समीर जोशी यांना घोषित झाला आहे. एन्व्हार्यन्मेन्टल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पर्यावरण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पर्यावरण भूषण पूरस्काराबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नंदकुमार गुरव यांना प्लॅस्टिक पुनर्निर्माण व कायदे अंमलबजावणी यासाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. सोमवारी (ता. १९) संध्याकाळी साडेपाच वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध हॉलमध्ये पुरस्काराचे वितरण होणार होईल, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष नितीन गोरे आणि खजिनदार डॉ. किरण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समिती सदस्य गणेश शिरोडे, मुकुंद परदेशी, माजी अध्यक्ष नितीन देशपांडे, नीलेश इनामदार आणि क्लबचे संस्थापक दत्तात्रय देवळे आदी उपस्थित होते. तसेच यंदाच्या पर्यावरण गौरव पुरस्काराने उपवनसंरक्षक राहुल पाटील (पुणे), राजेश जैन (पुणे), डॉ. सचिन पुणेकर (पुणे), पक्षीतज्ज्ञ डॉ. सुधाकर कुऱ्हाडे (नगर), देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले (पुणे), टेलस ऑर्गनाईझेशनचे लोकेश बापट (पुणे), शारंग अंबडकर (मुंबई), प्रा. अनुराधा कुलकर्णी (पुणे), अनिल (बॉबी) टिंगरे (पुणे), नारायण शिंदे (जुन्नर) यांना, तसेच व्हिकेई (पुणे), किर्लोस्कर ऑइल इंजिन (कागल), किर्लोस्कर न्युमॅटिक (पुणे), निओसॅम इंडस्ट्री, (सणसवाडी) आणि परसिस्टंट सिस्टीम (पुणे) या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.
फोटो ः 49432
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.