पुणे

बॅनरबाजी शहरात विनापरवाना फ्लेक्‍स, बॅनरबाजीचा धडाका सुरुच

CD

बेकायदा होर्डिंग्ज ः पुणे महापालिकेच्या कारवाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
शहरातील बॅनरबाजी थांबता थांबेना
पुणे, ता. १८ ः शहरात बेकायदा लावण्यात आलेली सुमारे तेराशे होर्डिंग्ज, अडीच लाख फ्लेक्‍स काढल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता वैयक्तीक कार्यक्रमापासून विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या व्यवसायांचे फ्लेक्‍स, बॅनर लावण्याचा प्रकार काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत किवळे येथे काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेनेही बेकायदा होर्डींग्जविरुद्ध कारवाई केली होती. होर्डींग्जसह फ्लेक्‍स, बॅनरही काढून टाकण्यात आले होते. मात्र काही दिवसानंतर कारवाई पुन्हा थंडावली. आत्तापर्यंत शहरात राजकीय कार्यक्रम, महापुरुषांची जयंती, धार्मिक कार्यक्रमांचे होर्डिंग्ज, फ्लेक्‍स व बॅनर मोठ्या प्रमाणात लावले जात होते. प्रशासनाकडून संबंधित कार्यक्रम झाल्यानंतर ते बॅनर तत्काळ उतरविले जातात. परंतु आता मात्र छोट्या, मोठ्या व्यावसायिकांच्या जाहिरातींचे फ्लेक्‍स, बॅनर शहरभर झळकत आहेत.
मागील काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांसह स्वयंघोषित दादा, भाईंचे वाढदिवस, स्पर्धा परिक्षांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फ्लेक्‍सपासून सजावट, विविध प्रकारच्या वस्तु, इंटरनेट सुविधा, विविध आजारांवरील औषधोपचार, खासगी क्‍लासेस, अभ्यासिका यांसारख्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे फ्लेक्‍स, बॅनर्स शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर लागले आहेत. होर्डींगप्रमाणे फ्लेक्‍स, बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना होर्डींगबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी शहरातील सुमारे तेराशे होर्डिंग्ज, अडीच लाख फ्लेक्‍स काढले आहेत, अजूनही कारवाई सुरु असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र फ्लेक्‍स, बॅनरबाजी सुरुच आहे.
---
पावसाळ्यात होर्डिंग्ज ठरतात जीवघेणे
पावसाळ्यामध्ये जोरदार वाऱ्यामुळे डळमळीत होर्डिंग्ज पडून जीवघेणे अपघात होण्याच्या दुर्घटना यापूर्वी घडल्या आहे. महापालिकेकडून होर्डींगविरुद्ध कारवाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे, मात्र पावसाळ्यात नागरिकांच्या जिवाशी धोका निर्माण होतो. त्यामुळे होर्डींगप्रमाणेच, फ्लेक्‍स बॅनरविरुद्ध सातत्याने कारवाई केली पाहिजे, असे नोकरदार बाळा वाघचौरे यांनी सांगितले.
---
दंडात्मक कारवाईची गरज
शहरात विविध ठिकाणी लावलेले फ्लेक्‍स, बॅनर महापालिकेकडून काढले जातात, मात्र फ्लेक्‍स, बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध ठोस व दंडात्मक कारवाई होत नाही. बॅनरबाजी करणाऱ्यांवर वचक नसल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढत आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी होण्यासाठी दंडात्मक कारवाई गरजेची आहे, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT