१) ‘संयम’चे २१ दिवाळी अंक
---------------------------
संयम पब्लिकेशनतर्फे दरवर्षी विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यंदाही तब्बल २१ दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. यावर्षी विनोदी, भविष्य, आरोग्यविषयक, लहान मुलांसाठी, पाककृती विशेषांक, पर्यटन, कथा विशेषांक, कौटुंबिक, अर्थकारण, गृहसजावट, नर्मदा परिक्रमा, कविता आदी बारा विभागामध्ये या अंकांची विभागणी करण्यात आली आहे.
विनोदी अंकामध्ये रविवारची धमाल जत्रा, विनोदी कथा, विनोदवल्ली, आला रे आला, टिंगलटवाळी असे पाच अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. यातील टिंगलटवाळी हा अंक अशोक टिकेकर यांच्या एकहाती लेख व कथांनी सजलेला आहे. त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना त्यांनी यातून उजाळा दिला आहे. विनोदवल्ली या दिवाळीअंकात विनोदी चुटकुल्यांचा समावेश आहे. विनोदी कथा या दिवाळीअंकात नागेश शेवाळकर, दिनेश राजा, शशिकांत भंडारे, नरेश काकडे, अशोक वरुडे यांच्या विनोदी कथा आहेत. रविवारची धमाल जत्रामध्ये राहुल भालेराव, बबन मोरे, सुधाकर बापट, सुतेजा दांडेकर, अंजली देशपांडे, अशोक शेगोकर, रमेश मुळे, स्नेहल अभ्यंकर आदींच्या कथा आहेत.
भविष्यविषयक या विभागात वार्षिक राशी भविष्य, तंत्र मंत्र तोडगे हे दोन दिवाळी अंक आहेत. घरचा वैद्य, डायलिसिस आहार आणि उपचार या दोन दिवाळी अंकाचा समावेश आहे. छोट्या दोस्तांचा छोटू, आजीच्या गोष्टी आणि गोट्या आदी अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. पाककृती विभागात दिवाळी फराळ हा अंक प्रकाशित करण्यात आला आहे. पर्यटन विभागामध्ये भारतातील पर्यटन या विषयावर अंक प्रकाशित करण्यात आला आहे. संयम व दीर्घकथा हे दोन दिवाळी अंक कथाविशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आले आहेत. कौटुंबिक या विभागात सॅंडविच (नवरा- बायको का भांडतात?) ‘श्यामची आई’ या दोन दिवाळी अंकाचा समावेश आहे. अर्थकारण विभागात ‘अर्थकारण’ नावाचा दिवाळी अंक आहे. यामध्ये शेअर बाजार व म्युच्युअल फंड याविषयी सर्वांगिण माहिती देण्यात आली आहे. गृहसजावट विभागात खट्टा मिठ्ठा हा दिवाळी अंक काढला असून, घरसजावटीबाबतची सगळी माहिती यात देण्यात आली आहे. नर्मदा परिक्रमा या दिवाळी अंकात परिक्रमाविषयी इत्यूंभूत माहिती देण्यात आली आहे. कविता या विषयाला वाहिलेला काव्यांजली हा दिवाळी अंक आहे. यामध्ये शिल्पा खरे, आनंद देशमुख, देवदत्त पाठक, शरद अत्रे, पुरुषोत्तम रोहणकार, पद्माकर कळसकर, नारायण वरुटे, एकनाथ आव्हाड, सुधाकर मोकदम, दिगंबर कुलकर्णी, सदानंद बामणे आदींच्या कविता आहेत.
सर्व अंकांचे संपादक ः अशोक टिकेकर, सुजाता गानू टिकेकर.
३) भविष्य
नरेंद्र मोदी सरकार आणि भविष्यातील राजकारण, मोदी यांचे यशापयश आणि ग्रहांची भूमिका, शिवसेना प्रमुखांच्या सावलीत घडलेले व्यक्तिमत्त्व ः मा. अरविंद सावंत, संधीचे सोने करण्याची मुरलीधर मोहोळ यांना संधी, संस्कृती पूजन, सप्तपदी, ब्रम्हांडातील तीन लोक आणि चौदा भुवन, ज्योतिषशास्त्रानुसार काही सोपे उपाय, नऊ ग्रहांचा प्रभाव, जन्मानुसार आणि जन्मतारखेनुसार ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींची शुभ आणि अशुभ वैशिष्ट्ये, ब्रम्हमुहूर्त किंवा निद्रा पुण्यक्षयकारिणी, चातुर्मास संपूर्ण माहिती, राहूची किमया, ग्रहांची शांती करणे म्हणजे काय, मूल म्हणून आपल्या घरी कोण जन्म घेते, यांसारखे विविध विषयांवरील लेख भविष्य या दिवाळी अंकात वाचण्यासाठी मिळणार आहेत. तसेच उत्सुकता असलेले राशीभविष्य ही या अंकात वाचता येणार आहे.
संपादक ः स्वामी विजयकुमार, पाने ः १२८, किंमत ः १५०
-----------------------------
४) शिखर
शिखर फाऊंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शिखर’ दिवाळी अंकामध्ये अनेक नामांकित आणि प्रसिद्ध लेखकांनी लेखन केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज आणि लेखिका डॉ. शीतल मालुसरे यांनी रायगडावर लिहिलेला लेख वाचनीय आहे. ‘तिकोना’ किल्ल्याच्या संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे किरण चिवटे, सायकल मित्र सुनील पाटील, भालचंद्र खराळकर, रूपाली कुलकर्णी, राकेश जाधव, विजय वसवे, सुहास गदादे यांनी या अंकासाठी लेखन केले आहे. वैभव देवकर व सागर मते या छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांनी अंकाला जिवंतपणा आणला आहे.
संपादक ः शिवाजी आंधळे, पाने ः ९०
फोटो ः 59482
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.