कोथरूड
किशोर शिंदे
राज्य सरचिटणीस, मनसे
कोथरूड विधानसभा मतदारसंघ
शिक्षण ः बी. कॉम, एमसीएम, एलएलबी
किशोर शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील राज्याचे सरचिटणीस असून, लिगल सेलचे राज्याचे अध्यक्ष आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उभारी आली. कोथरूड शिवजयंती महोत्सव व संगम तरुण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. शिंदे यांच्यातर्फे दरवर्षी महिलांसाठी दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो.
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल धन्यवाद. नगरसेवकपदाच्या काळात रस्ते, रुग्णालय, उद्यान, स्मशानभूमी अशा पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावली. कोथरूडचा विकास योग्य दिशेने करणे, वाहतूक कोंडी सोडविणे, त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर माझा भर असणार आहे. त्यामुळे या वेळी कोथरूडकर मला संधी देतील.
- किशोर शिंदे
राजकीय कारकीर्द
- २००७ आणि २०१२ मधील दोन महापालिका निवडणुकीत विजयी
- २००९, २०१४, २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र पराभव
- राज्य स्तरावर मनसेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत
- लीगल सेलच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी प्रयत्न
.....
हडपसर
साईनाथ बाबर
शहराध्यक्ष, मनसे
हडपसर विधानसभा मतदारसंघ
शिक्षण ः १० वी
बाबर हे कोंढवा भागातील मनसेचे कार्यकर्ते आहेत. २०१२ मध्ये त्यांची पत्नी या भागातून नगरसेविका झाली, तर २०१७ मध्ये साईनाथ बाबर नगरसेवक झाले. या १० वर्षांच्या काळात त्यांनी या भागातील दाट लोकवस्तीमध्ये नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला. ई-लर्निंग शाळा सुरू करणे, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधून घेतल्या. लुल्लानगर उड्डाण पुलासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे कोंढवा भागात अग्निशामक केंद्र सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज ठाकरे यांनी हडपसर विधानसभेची उमेदवारी दिली, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या भागातील मतदारांनी मला कायमच सहकार्य केले आहे, या वेळी विधानसभा निवडणूक लढताना ते मला मोलाची साथ देतील. हडपसरमध्ये आत्तापर्यंत तीन वेगवेगळे आमदार होऊन गेले. पण त्यांना वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचरा प्रकल्प, अतिक्रमणांचा प्रश्न सोडविता आलेला नाही. हे प्रश्न मी सोडविणार.
- साईनाथ बाबर
राजकीय कारकीर्द
- मनसेचा तळागाळातील कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात
- २०१२ मध्ये बाबर यांची पत्नी नगरसेविका
- २०१७ मध्ये साईनाथ बाबर नगरसेवक झाले.
- महापालिकेत पक्षनेते म्हणून काम पाहिले
- २०२१ पासून मनसेचे शहराध्यक्ष
......
मनसे
मयूरेश वाजंळे
मनसे कार्यकर्ता
खडकवासला विधानसभा मतदारसंघ
शिक्षण ः बीई सिव्हिल
मयूरेश वांजळे हे मनसेचे माजी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे पुत्र असून, गेल्या पाच वर्षांपासून ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. खडकवासल्यातील मतदारांना एक तरुण उमेदवार या निवडणुकीत लाभला आहे. खडकवासला मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागात त्यांनी कोरोना काळापासून संपर्क ठेवला आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे.
राज ठाकरे यांनी मला उमेदवारी जाहीर केल्याबद्दल धन्यवाद. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून माझे वडील मनसेच्या तिकिटावरच आमदार झाले होते. आता राज ठाकरे यांनी मला संधी दिली आहे. या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवमुद्रा नक्की फडकणार आहे.
- मयूरेश वांजळे
राजकीय कारकीर्द
- मयूरेश वांजळे यांचे वडिल २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विजयी
- त्यापूर्वी ते हवेली पंचायत समितीचे सदस्य, उपसभापती होते
- त्यांची आई जिल्हा परिषदेच्या सदस्य
- बहीण पुणे महापालिकेत नगरसेविका
- वारज्यासह खडकवासल्यातील ग्रामीण भागात वांजळे कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क
.......
हडपसर
चेतन तुपे
विद्यमान आमदार तथा उमेदवार
हडपसर विधानसभा मतदारसंघ
शिक्षण ः बीईसी सिव्हिल
-----
चेतन तुपे यांचे वडील विठ्ठलराव तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तीनदा आमदार, तर पुणे शहराचे खासदार म्हणून काम पाहिले. पुण्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या याच तुपे कुटुंबाचा राजकीय वारसा चेतन तुपे यांनी चालविला. महापालिका नगरसेवक ते मतदारसंघाचे आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकनिष्ठ कुटुंब अशी खास ओळख असणाऱ्या तुपे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांना साथ देणे पसंत केले. शरद पवार यांची नाराजी ओढावून घेत तुपे हे अजित पवार यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले.
मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी मी तळमळीने, प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचेच फलित म्हणून मला पक्षाने हडपसर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली. हा माझ्या एकट्याचा नव्हे, तर मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा बहुमान आहे. पाच वर्षांत सातत्याने मतदारसंघातील समस्या सोडविल्या, विधानसभेत मतदारसंघातील अडचणी मांडल्या. यापुढेही सर्वसामान्य मतदारांना केंद्रस्थानी मानून त्यांचे प्रश्न सोडवून या मतदारसंघाचा विकास अधिक गतीने करू.
- चेतन तुपे, आमदार.
राजकीय कारकीर्द
- वडील विठ्ठलराव तुपे यांच्यासवेत राजकीय, सामाजिक कार्याला सुरुवात
- २००७, २०१२, २०१७ असे तीन वेळा पुणे महापालिकेत नगरसेवक
- २०१७ मध्ये महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणूनही जबाबदारी
- २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष
- २०१९ च्या विधानसभेत भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव करून विजयी
- महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.