पुणे

वारकऱ्यांनी लुटला ‘पुणे दर्शन’चा आनंद

CD

पुणे, ता. १ ः पंढरपूरच्या दिशेने निघालेले लाखो वारकरी दोन दिवस पुण्यात मुक्कामी होते. हीच संधी साधत वारकऱ्यांनी सोमवारी (ता. १) दर्शनाचा आनंद लुटला. सारसबाग, पर्वती, शनिवारवाड्यासह अन्य ऐतिहासिक ठिकाणी आणि मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती.
संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन संतांच्या पादुका पंढरपूरला आषाढी वारीसाठी जात असताना, त्या पुण्यात एकत्र मुक्कामी असतात. त्यामुळे या दोन्ही पालख्यांमधील लाखो वारकरीदेखील सहभागी झाले होते. वारकरी शहरातील मंदिर, महापालिकेच्या शाळांमध्ये मुक्कामी होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणातील वारकऱ्यांची संख्या मोठी असते. अनेक वारकरी हे वर्षानुवर्षे पालखी सोहळ्यात सहभागी होतात, तर नव्या वारकऱ्यांचीही संख्या मोठी असते.
दोन्ही संतांचे पालखी सोहळे पुण्यात मुक्कामी असताना त्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पुणे शहरातील व उपनगरांमधील नागरिक पालखी विठोबा मंदिरात आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात गर्दी करतात. तर, वारीत सहभागी झालेले वारकरी पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरांमध्ये दर्शन घेण्यास प्राधान्य देतात. यामध्ये महिला, लहान मुलांचीही संख्या मोठी असते. सोमवारी सकाळपासून ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर, ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी मंदिर, सारसबाग, पर्वती, शनिवारवाडा, नाना वाडा, लाल महाल, तुळशीबागेतील राम मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, दत्त मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी होती.

जिजामातांच्या पुतळ्याला वंदन...
लाल महालात बाल शिवाजी आणि जिजामाता यांचा नांगरतानाचा पुतळा आहे. तेथे फोटो काढण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आयुष्य घडविणाऱ्या जिजामातांचा पुतळा बघितल्यानंतर महिलांना त्या पुतळ्याला हात लावून वंदन करण्याचा मोह आवरता आला नाही.

यंदा आम्ही सहकुटुंब वारी करत असून, माझी पत्नी, मुलगा, मामी अन्य काहीजण असे सातजण वाशीम येथून आलो आहोत. मुलाची ही पहिलीच वारी आहे. आज शनिवारवाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेलो होतो. पुण्यात नामस्मरणासोबतच पर्यटनाचाही आनंद घेता येतो.
सुभाष काळे, वारकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT