पुणे

‘सकाळ एनआयई’ सभासद नोंदणी सुरू

CD

पुणे, ता. ३ : नवा वर्ग, नवीन इयत्ता आणि पुन्हा एकदा उन्हाळी सुट्टी संपवून नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करायला नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व जिज्ञासूवृत्तीला तसेच कल्पनाशक्तीला वाव मिळावा, या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सकाळ माध्यम समूह’ घेऊन येत आहे ‘सकाळ एनआयई’ अर्थात ‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’ हा विद्यार्थिप्रिय उपक्रम.
‘सकाळ एनआयई’ अर्थातच ‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’ या इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. नाममात्र शैक्षणिक वर्षाचे ३०० रुपये सभासदत्व शुल्क भरून विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. सभासदत्व घेतलेल्यांना विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी साप्ताहिक स्वरूपातील १२ पानी अंक मिळणार आहे. यामध्ये मनोरंजन व ज्ञानाचा खजिना असलेल्या वाचनीय अशा सदरांसोबत सेमी इंग्रजी व विशेषतः इंग्रजी माध्यम शाळांतील विद्यार्थ्यांसाठी या अंकात दोन इंग्रजी पानांचा समावेश करण्यात आला आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचे माहितीपर सदर प्रसिद्ध करण्यात येणार असून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘SAKAL NIE’ या शैक्षणिक ॲपची मोफत नोंदणी करता येईल. या ॲपच्या माध्यमातून अभ्यासाची उजळणीही करता येणार आहे.
या अंकासोबत भेटवस्तू व विविध स्पर्धा तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी सभासदांना मिळणार आहे. त्यामुळे आजच या उपक्रमाचे सभासदत्व घेण्याचे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे. ऑनलाइन पद्धतीने आजच आपल्या पाल्यांसाठी हा अंक आपल्या वृत्तपत्रविक्रेत्याकडून घरपोच सुरू करता येणार आहे.

शैक्षणिक वर्षात मिळणाऱ्या सुविधा
१) शैक्षणिक वर्षात ‘सकाळ एनआयई’ अंक वाचनीय सदरांसह साप्ताहिक स्वरूपात
२) आकर्षक भेटवस्तू
३) विविध कार्यशाळा व स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी
४) शालेय अभ्यासाची उजळणी करण्यासाठी ‘SAKAL NIE’ शैक्षणिक ॲप मोफत
५) विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षकांसाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी


- अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक : ९८८१५९८८१५

मुख्याध्यापकांना आवाहन
‘सकाळ एनआयई’ या शाळानिहाय उपक्रमाची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सभासदत्व नोंदणी सुरू झाली आहे. हा विद्यार्थिप्रिय उपक्रम आपल्या विद्यालयात राबवू इच्छिणाऱ्या मुख्याध्यापकांनी नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयात किंवा नजीकच्या वृत्तपत्रविक्रेत्याकडे अथवा ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT