पुणे

‘ऑफलाइन’ बदल्या वाहन निरीक्षकांच्या पथ्यावर

CD

पुणे, ता. ३ ः राज्यातील मोटार वाहन निरीक्षकांच्या ‘विनंती बदल्या’ ऑफलाइन पद्धतीने मंगळवारी (ता. २) करण्यात आल्या. सुमारे ७० मोटार वाहन निरीक्षकांनी पूर्वी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बदल्यांबाबत नाराजी व्यक्त करत त्या रद्द करण्याची मागणी केली होती. शासनाने अखेर ते मान्य केले असून मंगळवारी पहिल्या टप्प्यात ८ मोटार वाहननिरीक्षकांनी मागणी केलेल्या ठिकाणी बदलीचा आदेश काढला आहे. याचा अर्थ नोव्हेंबर २३ मध्ये ज्या ऑनलाइन बदल्या झाल्या होत्या, त्या गैरसोयीच्या होत्या. तसेच विशिष्ट हेतू बाळगून करण्यात आलेल्या होत्या, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
परिवहन विभागाने नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्यातील १५६ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या केल्या होत्या. त्या वेळी ९२ टक्के निरीक्षकांचे समाधान झाले असल्याचे शासनाला कळविले होते. मात्र त्याच वेळी मोटार वाहन निरीक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्या बदल्या गैरसोयीच्या होत्या. त्यामुळेच सुमारे ७० निरीक्षकांनी ‘विनंती बदली’चा अर्ज केला होता. यात प्रत्येकाचे कारण वेगळे असले तरीही त्यांना बदलीचे ठिकाण बदलून घेणे हाच उद्देश होता. शासनाने त्यांची मागणी मान्य करीत मंगळवारी ८ निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे मोटार वाहन निरीक्षकांनी व त्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

‘तो’ अर्ज अद्याप विचाराधीन
विनंती बदलीसाठी राज्यातील ७० मोटार वाहन निरीक्षकांनी अर्ज केले आहेत. तसेच काहींनी मुदतवाढीसाठीदेखील अर्ज केले आहेत. यात ‘त्या’ वादग्रस्त निरीक्षकाचादेखील समावेश आहे. परिवहन आयुक्त कार्यालयापासूनच जवळच चार कार्यालये आहेत. त्या ठिकाणी बदली न मागता परिवहन आयुक्त कार्यालयातच मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी ‘आयपीएस’ निरीक्षकाने केली आहे. यामागे परिवहन आयुक्त कार्यालयातील ‘अर्थ’पूर्ण हितसंबंध असल्याचे बोलले जात आहे. बदलीस पात्र असतानादेखील ‘अर्थ’कारणांमुळे त्या निरीक्षकास मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात असल्याने ‘आरटीओ’च्या पारदर्शकतेचा दावा फोल ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT