पुणे

बारा गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे

CD

पुणे, ता. ३ : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने झिका विषाणूचे रुग्ण आढळलेल्या भागातील गर्भवतींचे सर्वेक्षण आणि त्यांच्या आरोग्य तपासणीची मोहीम प्राधान्याने हाती घेतली आहे. त्या अंतर्गत बुधवारी १२ गर्भवतींची तपासणी करून त्यांचे रक्त नमुने विश्लेषणासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.
शहरात दोन गर्भवतींना झिकाच्या संसर्गाचे निदान झाले आहे. त्यामुळे महापालिकेसह राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्या अंतर्गत हे रक्तनमुने घेण्यात आले आहेत. त्यात एरंडवणे येथील दोन, मुंढवा आणि डहाणूकर कॉलनी येथील प्रत्येकी पाच असे रक्तनमुने घेण्यात आले.
सहकार्याचे आवाहन
संशयित रुग्णांच्या तपासणी मोहिमेला काही नागरिक सहकार्य करीत नसल्याची माहिती पुढे आली आहे. ते आरोग्य तपासणीला विरोध करीत आहेत. त्यामुळे या मोहिमेला मर्यादा पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर पुणेकरांनी महापालिकेला सहकार्य करावे. तसेच, सोसायट्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा, डासांची पैदास होणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गर्भवतींना धोका
झिका विषाणूच्या संसर्गामुळे प्रसूतीमधील गुंतागुंत आणखी वाढण्याचा धोका असतो. या संसर्गामुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात किंवा जन्मत: दोष, मेंदूविकार असे धोके वाढतात. त्यामुळे गर्भवतींच्या तपासणीवर भर दिला जात आहे. संसर्ग प्रतिबंधासाठी गर्भवतींच्या तपासणीसाठी नियमावली तयार करण्यात येईल. त्याची माहिती शहरातील रुग्णालयांना आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
---
गर्भवतींबाबत प्रमुख मुद्दे
- झिकाची लक्षणे असल्यास रक्तनमुने ‘एनआयव्ही’ला पाठवा
- सोनोग्राफी करावी
- प्रयोगशाळेतून अत्यावश्यक तपासण्या करणे
--
झिका नियंत्रणातील आव्हाने
- डासोत्पत्ती नियंत्रित करणे
- सोसायट्यांच्या परिसरात साचलेले पाणी
- डबक्यांमध्ये, टायरमध्ये डासांची झालेली पैदास
---

महापालिकेने केलेली कारवाई
- एरंडवणे भागातील ४४ घरमालकांना नोटिसा
- ८३०० रुपयांचा दंड वसूल
- मुंढव्यातील नऊ घरमालकांना नोटीस देऊन ५ हजारांचा दंड
- डहाणूकर कॉलनीतील तार घरमालकांना नोटीस देऊन तीन हजारांचा दंड
---

शहरातील बारा गर्भवतींचे रक्त नमुने विश्लेषणासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहे. रुग्ण आढळलेल्या भागात. महापालिकेने सर्वेक्षण मोहीम राबविली आहे. त्यातून आढळलेल्या संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. कल्पना बळीवंत, आरोग्य प्रमुख, महापालिका
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT