पुणे

शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे

CD

पुणे. ता, ४ : ‘‘राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगामामध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र राहील. शुल्क सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये राहील.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः: कसत असणे, आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड केलेली असणे आवश्यक आहे.
पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.

प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये...
स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ४० हजार रुपये, तृतीय क्रमांक ३० हजार रुपये, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७ हजार, तृतीय क्रमांक ५ हजार रुपये आणि तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ३ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये पारितोषिक आहे.

अधिक माहितीसाठी...
राज्याच्या कृषी विभागाचे संकेतस्थळ- https://krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT