पुणे

महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला पेटविण्याचा प्रयत्न

CD

पुणे, ता. ६ : रस्त्यात अडविल्याच्या कारणावरून वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात मध्यवस्तीत बुधवार चौकात शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोलिस वाहतूक नियमन करत होते. या वेळी पोलिसांनी संशयावरून एका वाहन चालकाला अडविल्यानंतर त्याने पोलिसांसोबत वादावादी केली. त्यानंतर एकाने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकले. परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले.

पुनर्जन्मच झाला
‘‘आमच्या अंगावर पेट्रोल टाकल्यानंतर नेमके लायटर उलटे धरल्यामुळे आमचा जीव वाचला. आमचा पुनर्जन्मच झाला आहे. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. एक तासभर तरी मला बोलता आले नाही’’, अशी प्रतिक्रिया संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

या संदर्भात आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT