पुणे

सौर कृषीपंपासाठी १४ दिवसांत १ लाख २२ हजार अर्ज

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी सुरू केलेल्या महावितरणच्या वेबसाइटवर १४ दिवसांत राज्यभरातून १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा, यासाठी महावितरणने वेबसाइट तयार केली आहे. त्यावर १४ दिवसांत राज्यभरातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून ५२ हजार ६७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर बीड (२४,५२६ अर्ज), परभणी (१५,०४३ अर्ज), छत्रपती संभाजीनगर (६,८८८ अर्ज) आणि हिंगोली (५ हजार ७९ अर्ज) येथील शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात मिळते. सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला, की शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहत नाही, तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी केवळ दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

या वेबसाइटवर नोंदणी करा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. वेबसाइटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्‍नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही वेबसाइटवर तपासता येते, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

SCROLL FOR NEXT