पुणे

पुण्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

CD

पुणे, ता. ६ ः पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीत धावणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी (ता. ६) सकाळी घडली. तरुणाच्या मृत्युमागचे कारण अद्याप समजले नाही.
तुषार बबन भालके (वय २७, रा. कोठे बुद्रूक, संगमनेर, अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मैदानावर धावताना तो सकाळी आठच्या सुमारास चक्कर येऊन पडला. शवविच्छेदनानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
भालके हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील कोठे बुद्रूक गावचा आहे. तो पुण्यात भरतीसाठी आला होता. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू आहे. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या ८०० ते ८५० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. उमेदवारांना क्रमांक (चेस्ट नंबर) देण्यात आले आहे. मैदानी चाचणीसाठी धावण्यासाठी एक हजार ६०० मीटरचे अंतर देण्यात आले होते. शनिवारी तुषारने धावण्यास सुरुवात केली. काही वेळात तो मैदानात चक्कर येऊन पडला. तुषार मैदानात चक्कर कोसळल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. तुषारच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT