पुणे

विमानतळाला हवा जनसंपर्क अधिकारी

CD

विमानतळाला हवा
जनसंपर्क अधिकारी
मोहोळ यांच्याकडे मागणी
पुणे, ता. ६ ः प्रसार माध्यमांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी पुणे विमानतळाला सक्षम जनसंपर्क अधिकारी असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही नियुक्ती करावी, अशी मागणी हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.
त्यांनी सांगितले की, ‘‘पुणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. पुणे विमानतळ देशातील पहिल्या दहा विमानतळांपैकी असल्याने येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. येत्या काही दिवसांतच नवे टर्मिनल प्रवाशांसाठी खुले होत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या आणखी वाढेल. प्रवाशांच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमे नेहमीच आवाज उठवितात. अनेकदा विमानतळ व्यवस्थापक पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत. पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके हे अनेकदा प्रवाशांच्या प्रश्नांवर मौन बाळगतात. पत्रकारांना अपेक्षित असा प्रतिसाद देत नाही. यामुळे विमानतळाच्या व्यवस्थापनावरील विश्वासाला तडा जाऊ शकतो. हे अत्यंत विचित्र आणि चिंताजनक असा प्रकार आहे.’’
‘जनसंपर्क अधिकारी यांची नियुक्ती झाल्यास प्रवाशांच्या प्रश्नांना न्याय मिळेल. पुणे विमानतळ प्रशासनाचे काम पारदर्शक आणि जबाबदार असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही नियुक्ती लवकरात लवकर करावी,’ असे वंडेकर इ-मेलमध्ये नमूद केले आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT