पुणे

मुठेतील रांजणखळग्यांना ‘अच्छे दिन’

CD

पुणे, ता. ८ : शहराचा भू-वारसा असणाऱ्या आणि सध्या कचऱ्याने वेढलेले नांदेडगाव-शिवणे पुलाजवळील मुठा नदीतील रांजणखळगे स्वच्छ करण्याचे कामाला वेग आला आहे. पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेले मुठा नदीतील या रांजणखळग्यांमध्ये कचरा साचल्याने ते दुर्लक्षित झाले होते. परंतु, या रांजणखळग्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेने स्थानिक नागरिकांच्या मदतीने येथे साफसफाईचे काम सुरू केले असून सोमवारी तब्बल आठ टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आला.
‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी करून नांदेडगाव ते शिवणे पूलाजवळ मुठा नदी पात्रात असणाऱ्या रांजणखळग्यांच्या दुरवस्थेचे वास्तव बातमीच्या माध्यमातून समोर आणले. यासंदर्भात ‘सकाळ’ने ‘रांजणखळगे पहायचेत, अहो मग पुण्यातच पहा; मुठा नदीतील रांजणखळगे दुर्लक्षित’ या शीर्षकाखाली रविवारी (ता. ७) बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सोमवारी महापालिकेने रांजणखळग्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू केले. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून या परिसरातील कचरा काढण्याच्या कामाला सुरवात झाली.
नांदेड सिटीमागील बाजूस, नांदेडगाव येथील स्मशानभूमीमागून शिवणेकडे जाणाऱ्या पुलाजवळच मुठा नदीपात्रात हे खळगे आहेत. शहराच्या भू वारसा आणि वैभव असणारे हे खळगे सध्या घाणीने वेढलेले होते. मात्र, ‘सकाळ’ने बातमी दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत परिसराची स्वच्छता केली आहे. या परिसरातून वारजे आणि सिंहगड रस्ता या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जवळपास आठ ते नऊ टन कचरा गोळा केला. आगामी काळात पुलावर जाळी लावण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय, कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सकाळी दहा वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी रांजणखळग्यांतील कचरा उचलण्यास सुरवात केली. वारजे क्षेत्रीय कार्यालय आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन येथील कचरा उचलला आणि साफसफाई केली, अशी माहिती महापालिकेच्या वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक दत्तात्रेय दळवी यांनी दिली.

मुठा नदीतील रांजणखळगे असणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पसरला होता. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत आम्ही नदीपात्रात रांजणखळग्यांची स्वच्छता केली. यावेळी साफसफाई करण्यासाठी जवळपास ४० कर्मचारी होते. आता नदीपात्रात रांजणखळगे असणाऱ्या परिसरात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय पुलावर कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाईल. तसेच, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- गिरीश खिरीड, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वारजे क्षेत्रीय कार्यालय, महापालिका

संवर्धन करण्याचा निर्धार
‘‘मुठा नदीतील रांजणखळग्यांबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी आल्यानंतर तत्परतेने निसर्गाचा आविष्कार असणाऱ्या खळग्यांचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात आली. खळगे आणि परिसरातून दोन्ही बाजूंनी जवळपास आठ टनाहून अधिक कचरा काढण्यात आला. हा भू-वारसा पाहून थक्क व्हायला होते, हा जपला जाणे, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शक्य ते करण्यात येईल. आता या भागात स्वच्छता केली आहेत. रांजणखळग्यांचे वैभव जाता-येता नागरिकांना दिसावे, यासाठी नदीपात्रातील वाढलेले गवत काढण्यासाठीही पावले उचलली जातील. याशिवाय
पावसाळ्यानंतर हे सौंदर्य अधिकाधिक नागरिकांना समजावे, यासाठी उपक्रम राबविण्यात येतील, असे महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपनार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT