पुणे

झिकामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका

CD

पुणे, ता. ८ : ‘‘पुणे शहरात झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आणि विशेषतः गर्भवतींमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याने सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. झिकासाठी लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत,’’ अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
झिका हा डासांमार्फत पसरणारा आजार आहे. हे डास दिवसा चावतात. लैंगिक संबंधांमधून, आईकडून बाळाला, रक्त संक्रमणातून आणि प्रयोगशाळेशी संपर्कातूनदेखील या आजाराची लागण होऊ शकते, असे सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांनी सांगितले.
गरोदर असताना झिकाची लागण झाल्यास नवजात बाळामध्ये मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृती उत्पन्न होऊ शकतात. त्याचप्रमाणे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्माला येणे, गर्भपात असे गंभीर दोषदेखील संभवतात. संशोधनातून दिसून आले आहे की, याचा संक्रमणदर ९ ते ३५ टक्के असू शकतो. ७ ते ४५ टक्के जन्मांमध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
झिकाचा संसर्ग झालेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. सौम्य ताप, रॅशेस, सांधेदुखी, डोळे जळजळणे आणि डोकेदुखी ही झिकाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करावेत. झिकावर कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत, त्यामुळे हा आजार होऊ नये, पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे. गर्भवतींना झिकाची लागण झाल्याचा संशय असल्यास त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, गर्भाच्या वाढीवर, हालचालींवर नियमितपणे व बारकाईने लक्ष ठेवावे, त्याची नीट देखभाल करावी. आजार लवकरात लवकर लक्षात यावा आणि लक्षणांवर उपचार केले जावेत यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि साह्य पुरवण्यात आरोग्य सेवा पुरवठादारांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही माळी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनंत अंबानींकडून Lalbaug Cha Raja साठी 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण, किंमत ऐकून व्हाल थक्क

Ladki Bahin Yojana : आता 'आपलं सेवा केंद्रा'तून होणार नाही 'लाडकी बहीण'ची नोंदणी; सरकारनं का घेतला निर्णय? जाणून घ्या

Record Breaking: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतानं जिंकली विक्रमी पदकं; Medal Tallyत गरुडझेप!

Ladki Bahin Yojna: ''मुख्यमंत्री हा टीमचा कॅप्टन, त्यामुळे...'' लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरुन एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

BJP J&K Mainfesto: जम्मू-काश्मीरसाठी भाजपचं 'संकल्प पत्र' जाहीर; काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासह 'या' महत्वाच्या गोष्टींचं दिलं वचन

SCROLL FOR NEXT