पुणे

जमिनीच्या व्यवहारातून खुनामुळे जन्मठेपेची शिक्षा

CD

पुणे, ता. ८ : जमिनीच्या व्यवहारातील वादातून एकाचा धारदार हत्याराने वार करून खून केलेल्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. सुरेश ऊर्फ बाळासाहेब बापूराव सातपुते (वय ६४, रा. बावधन) असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी विलास पुंडलिकराव साबणे (वय ५१) यांचा खून केल्याचा आरोप होता. साबणे यांची पत्नी विद्या यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सातपुतेने पैसे मिळाल्यानंतर जमीन द्यावी लागून नये म्हणून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. पौडचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी विद्याधर निचीत आणि आकाश पवार यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. दंड भरल्यानंतर त्यातील दोन लाख रुपये साबणे यांच्या पत्नीला देण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले.
मुळशीमधील वळणे येथे राहणाऱ्या सातपुतेने जमीन विक्रीसाठी काढल्याची माहिती साबणे यांना मित्राकडून मिळाली. त्यानुसार साबणे पती-पत्नी जमीन पाहण्यासाठी गेले. जमीन पसंत पडल्याने त्यांनी व्यवहार ठरविला. नऊ लाख १० हजार रुपये इतकी जमिनीची किंमत निश्चित झाली. सुरुवातीला एक लाख आणि नंतर चार लाख रुपये सातपुतेला देण्यात आले. उरलेले पैसे खरेदीखत झाल्यावर एका वर्षाने द्यायचे ठरले होते.
---

मोजणी करायला बोलावून...
जमिनीची मोजणी सात नोव्हेंबर २०१९ रोजी करायची आहे असे आरोपी सातपुतेने साबणे यांना फोनवरून सांगितले. त्यानुसार साबणे मोजणीला गेले. त्यांनतर साबणे यांना पत्नीने फोन केला असता त्यांचा फोन स्वीच ऑफ लागला. आरोपीचाही फोन बंद होता. पती न सापडल्याने साबणे यांच्या पत्नीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, पौड पोलिसांनी वळणे येथे एकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती डेक्कन पोलिसांना दिली. तो मृतदेह साबणे यांचाच असल्याचे पत्नी आणि मुलाने ओळखले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT