पुणे

भूकरमापकची सुधारित प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

CD

पुणे, ता. ९ : भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपिक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतीक्षायादी प्रसिद्ध केली आहे.
जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन परीक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने १७ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत कागदपत्रे पडताळणी केली होती. त्यात पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन यापूर्वी प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षा यादी उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश पुणे व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या कार्यालयांच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती भूमी अभिलेखचे उपसंचालक अनिल माने यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT