Mhada Homes  Sakal
पुणे

Mhada Homes : चार हजार घरांसाठी ३० मेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील चार हजार ७७७ सदनिकांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना या घरांसाठी आता ३० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील चार हजार ७७७ सदनिकांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना या घरांसाठी आता ३० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास ७ मार्चपासून सुरुवात झाली. या सोडतीमध्ये म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दोन हजार ४१६ सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील १८ सदनिका, म्हाडा पीएमएवाय योजनेत ५९ सदनिका,

पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत ९७८ सदनिका, २० टक्के योजनेतील पुणे महापालिकेमध्ये ७४५ सदनिका आणि २० टक्के योजनेतील पिंपरी-चिंचवडमध्ये ५६१ सदनिका आहेत.

नागरिकांनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केल्याने म्हाडाने ही मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

म्हाडाच्या घरांसाठीची सोडतीपूर्वीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, सोडत तसेच सोडतीनंतरची ताबा प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकरणाद्वारे ऑनलाइन पार पाडण्यात येणार असल्याने सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

येथे करता येईल अर्ज


म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT