पुणे, ता. १२ : ‘‘अयोध्येत भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. त्यामध्येही विघ्न आणण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत. ज्यांना काही त्रास झाला नाही, असेही लोक वाद करत आहेत. ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना होईल, तो दिवस आमच्या दृष्टीने जगातील सर्वांत पवित्र असेल,’’ अशा शब्दांत गंगा महासभेचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी विरोधकांवर टीका केली. ‘प्राणप्रतिष्ठापनेसाठी श्रीरामाने ज्यांची निवड केली, तेच हात आमच्या दृष्टीने जगातील सर्वांत पवित्र हात आहेत,’ असेही ते म्हणाले.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वानवडी येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया फाउंडेशन वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी साध्वी ऋतंभरा देवी, दिल्ली जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री धूलपुडी पंडित, डिकीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, माय होम इंडियाचे सुनील देवकर आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश होले आदी मान्यवर होते. मान्यवरांच्या हस्ते १२ युवकांचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’, तर शंभर महिलांचा ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. प्राणप्रतिष्ठापनेच्या मुर्हूतावरून विरोधी पक्ष आणि शंकराचार्यांनी आक्षेप घेतला आहे. स्वामी सरस्वती यांनी त्यांचा समाचार आपल्या भाषणातून घेतला. ते म्हणाले, ‘‘माता कैकयीने श्रीरामाला १२ वर्षांचा वनवास दिला होता. परंतु बाबरी मशिदीचा ढाचा कोसळल्यानंतर न्यायालयीन वादामुळे २८ वर्षांचा वनवास श्रीरामाला सहन करावा लागला. ज्यांना काही त्रास झाला नाही, ते रामाची प्रतिष्ठापना होत असताना रामनवमीच्या मुर्हूताचे कारण पुढे करून विघ्न आणण्याचे काम करत आहेत. अशा तथाकथितांना काशीच्या ज्योतिष्यांनी शास्त्रपद्धतीने चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले आहे. हा संघर्ष आजचा नाही, तर ४९२ वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे श्रीराम मंदिरात विराजमान होणार, तो दिवस आमच्यासाठी सर्वांत पवित्र दिवस आहे.’’
साध्वी ऋतंभरा देवी म्हणाल्या, ‘‘रामजन्मभूमीसाठी ज्या कारसेवकांनी बलिदान दिले, ज्या तपस्वींनी तप केले, ते पूर्ण होण्याची ही वेळ आली आहे.’’
‘मोदी है तो मुकिंन है’ असे सांगून शांतिश्री पंडित म्हणाल्या, ‘‘अयोध्येनंतर आता मुथरेकडे वळावे लागणार आहे.’’
या वेळी डॉ. कांबळे आणि देवकर यांची भाषण झाली.
फोटो - ९५५९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.