Sassoon Hospital sakal
पुणे

Sasoon Hospital : ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली ; ‘मार्ड’ने पुकारलेल्या संपात ४०० निवासी डॉक्टर सहभागी

निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संपात ४०० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संपात ४०० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील दोन खोल्यांमध्ये पाच ते सात निवासी डॉक्टर राहातात. महाविद्यालयांबरोबरच विद्यार्थ्यांची संख्या वाढली, पण वसतीगृह आणि पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत. या सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर’ने (मार्ड) पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. त्याला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरही संपात उतरले आहेत.


याबाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘मार्ड’चे सचिव डॉ. अमेय राऊत म्हणाले, ‘‘महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली, पण त्या तुलनेत मूलभूत सुविधा वाढल्या नाहीत. निवासी डॉक्टरांना पायाभूत सुविधा मिळविण्याची वारंवार मागणी करण्यात आली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे निवासी वैद्यकीय डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. या संपाच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, बाह्यरुग्ण विभाग, नियोजित शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत.’’


ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा विस्कळित होणार नाही, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले, ‘‘संपामध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे नियमित वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे, तसेच बाह्यरुग्ण विभाग, रुग्णालयातील कक्षांमध्ये महाविद्यालयातील शिक्षक, प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी रुग्णसेवा केली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

लोकशाहीच्या उत्सवात लालपरीची सेवा! राज्यभरासाठी 9,232 बसगाड्या; ‘एवढ्या’ अंतरावरील कर्मचाऱ्यांसाठीच बसगाडी; प्रवासी वाहतूक 2 दिवस राहणार विस्कळीत

SCROLL FOR NEXT