पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये लवकरच दिव्यांग साहाय्य कक्ष आणि समान संधी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रशासन शिक्षकेतर कक्षाने विद्यार्थी संघटनांना पत्राद्वारे कळविले आहे.
अशा कक्षाची मागणी युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केली होती. विद्यापीठ प्रशासनाने पत्रात म्हटले की, ‘विद्यापीठाच्या प्लेसमेंट कक्षामध्ये दिव्यांग साहाय्य कक्षाची स्थापना करण्यात येत आहे, तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विद्यार्थी सुविधा केंद्रात समान संधी केंद्र स्थापन करण्यात येईल. त्याची सुरुवात महिना अखेपर्यंत होईल.’
गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी दिली. युवासेनेचे शहरध्यक्ष राम थरकुडे म्हणाले, ‘‘दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी आम्ही कक्ष स्थापन करण्याची मागणी केली होती. विद्यापीठाने ती मागणी मान्य केली आहे. त्यासह समान संधी केंद्रदेखील निर्माण केले जात आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.