पुणे

‘जुनं फर्निचर’ चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित

CD

ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट शुक्रवारपासून (ता. २६) राज्यभरात प्रदर्शित होत आहे. ‘या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा’ अशी अनोखी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
या चित्रपटानिमित्त महेश मांजरेकर यांनी चित्रपटाच्या चमूसह ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत संवाद साधला. ‘‘या चित्रपटाची कथा अनेक दिवसांपासून माझ्या मनात घोळत होती; पण कागदावर उतरली नव्हती. आई-वडिलांना आपण खूप गृहित धरतो. ज्यांनी लहानपणी आपल्या प्रत्येक प्रश्नाची संयमाने उत्तरे दिली, त्यांच्या एकेका प्रश्नाला उत्तरे देताना आपण वैतागतो, त्यांच्यावर चिडतो. ज्या वयात आई-वडिलांना मुलांची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. याच परिस्थितीचा आरसा दाखवणारी कथा मी या चित्रपटातून मांडली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मुलांना आत्मपरीक्षण करावेसे वाटेल आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल होतील’’, याची मला खात्री आहे.

चित्रपटात महेश मांजरेकर यांच्यासह मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर यांच्याही भूमिका आहेत. आपल्या भूमिकेबाबत भूषण म्हणाला, ‘‘महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे, हे तर माझे स्वप्न होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ते पूर्ण होत आहे, याचा आनंद आहे. त्यांच्यासह काम करताना खूप शिकायला मिळाले. चित्रपटात मी त्यांच्या मुलाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेत आजच्या पिढीतील प्रत्येकाला आपले प्रतिबिंब सापडेल आणि त्यातून आपल्या होत असणाऱ्या चुकाही लक्षात येतील.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT