JEE Mains Exam 2024 esakal
पुणे

JEE Mains Result 2024: जेईई मेनचा रिझल्ट जाहीर, एका क्लिक मध्ये पहा संपूर्ण निकाल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन २०२४चे मेरिट स्कोअर जेईई मेन जानेवारी आणि जेईई मेन एप्रिल परीक्षेच्या सर्वोत्तम स्कोअरवर आधारित जारी केले आहेत.

CD

पुणे, ता. २५ ः अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्यचा (जेईई मेन) निकाल जाहीर झाला आहे. जेईई मेन २०२४ मध्ये ५६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. दिल्लीतील शायना सिन्हा आणि कर्नाटकातील सान्वी जैन या १०० पर्सेंटाईल गुण मिळविणाऱ्या उमेदवारांच्या यादीत दोन मुलींचाही समावेश आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील भूमिका साहा हिने तृतीयपंथी श्रेणीत ५६.६७८ पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in किंवा ntaresults.nic.in वर जाऊन त्यांचे गुण तपासू शकतात.


नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन २०२४चे मेरिट स्कोअर जेईई मेन जानेवारी आणि जेईई मेन एप्रिल परीक्षेच्या सर्वोत्तम स्कोअरवर आधारित जारी केले आहेत. ‘एनटीए’ने सांगितले की या परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळालेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक १५ विद्यार्थी तेलंगणातील आहेत. यानंतर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सात आणि दिल्लीतील सहा आहेत. परीक्षेदरम्यान अनुचित मार्ग वापरल्याबद्दल २९ उमेदवारांना जेईई-मेनसाठी तीन वर्षांसाठी उपस्थित राहण्यास प्रतिबंधित करण्यात आले होते.

निकाल दृष्टिक्षेपात

परीक्षेला बसलेले विद्यार्थी ः १०,६७,९५९
जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरलेल ः २,५०,२८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

Beed News : मुंडेंच्या जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंच्या शब्दालाही मान

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

SCROLL FOR NEXT