पुणे

‘टेल मी अ स्टोरी’ प्रदर्शन शनिवारपासून

CD

‘टेल मी अ स्टोरी’ प्रदर्शन शनिवारपासून
पुणे, ता. १५ ः स्मिता राजे-देशपांडे आणि मनिषा वेदपाठक यांच्या ‘कलागोष्टी’ या संस्थेतर्फे शनिवारपासून (ता. १९) ‘टेल मी अ स्टोरी’ या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ४० हून अधिक कलाकार सहभागी होणार असून, चित्र, शिल्प, नृत्य, कविता, दृकश्राव्य कला आदी विविध कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता. २१) सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत भूगाव येथील पूना वेस्टर्न क्लब येथे सर्वांसाठी खुले असेल.
----
‘ऊर्जा’ युवा संगीत सभा रविवारी
पुणे, ता. १५ ः नव्या पिढीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मएसो कलावर्धिनी आणि स्वराधार फाउंडेशन यांच्यातर्फे येत्या रविवारी (ता. २०) ‘ऊर्जा’ युवा संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेच्या आवारातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात होणार असल्याची माहिती स्वराधार फाउंडेशनचे संचालक नील दीक्षित यांनी दिली. या वेळी अनिरुद्ध देशपांडे यांचे एकल तबलावादन, कल्याणी देशपांडे यांचे सतारवादन आणि केदार केळकर यांचे गायन होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
----
‘प्रकृती’ प्रदर्शन २३ ऑक्टोबरपासून
पुणे, ता. १५ ः चित्रकार कल्याणी भोगले आणि क्रोशे कलाकार रचना बजाज यांच्या ‘प्रकृती - दी इसेन्स ऑफ नेचर’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. चित्रांसह क्रोशे कला
यांच्या माध्यमातून निसर्गाचे अनेकविध आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT