Action against cab suspended by RTO relief to passengers Sakal
पुणे

Pune : कॅबवरील कारवाई ‘आरटीओ’कडून स्थगित ; प्रवाशांना दिलासा

दोन दिवसांत ४० कॅबवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) आता कारवाई थांबवली आहे. प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : दोन दिवसांत ४० कॅबवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) आता कारवाई थांबवली आहे. प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात ओला, उबरसारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या कॅब कंपन्यांना अॅग्रीग्रेटरचा (प्रवासी वाहतूक) परवाना नाकारण्यात आला. त्यांना राज्याच्या परिवहन विभागाकडे दाद मागण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र प्रवासी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे ‘आरटीओ’ने गेल्या दोन दिवसांत सुमारे ४० कॅबवर कारवाई केली. त्यामुळे ही सेवा काहीशी विस्कळित झाली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कॅबचालकांवरील कारवाई थांबविण्यात आली.

विमानतळावर प्रवासी खोळंबले

‘आरटीओ’च्या भरारी पथकाने गुरुवारी रात्री शहरातील विविध भागांत फिरून कॅबवर कारवाई केली. त्याची माहिती अन्य कॅबचालकापर्यंतदेखील पोहचली. कारवाईची तीव्रता मध्यरात्री वाढली. परिणामी पुणे विमानतळावर रात्री दाखल झालेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी कॅब उपलब्ध होत नव्हत्या.

कॅबचालक कारवाईच्या भीतीने सेवा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे एरोमॉलमधील ओला व उबरच्या काउंटरजवळ प्रवाशांनी गर्दी केली होती. दुसरीकडे ओला, उबरच्या प्रतिनिधीसोबत चालकांचे वाद निर्माण झाले. ही परिस्थिती शुक्रवारी सकाळपर्यंत होती. दुपारनंतर ‘आरटीओ’ने कारवाई थांबवली आहे. हा संदेश चालकांमध्ये पसरल्यानंतर सेवेला पु्न्हा सुरुवात झाली.

मी गेल्या एक तासापासून कोथरूडला जाण्यासाठी कॅब बुक करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ती होत नाही. समोर कॅबचालक आहेत. पण त्यांचा प्रतिसाद नाही. काउंटरवरील संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यालादेखील सांगितले. त्यांनी थोडा वेळ थांबण्यास सांगितले आहे.
- साक्षी पवार, प्रवासी, एरोमॉल, विमानतळ

कॅबवरील कारवाईमुळे प्रवाशांना त्रास होत आहे, तो होऊ नये म्हणून आम्ही कारवाई थांबवली आहे. शिवाय संबंधित कंपन्यांना दाद मागण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. ३० दिवसांनंतर पुढील निर्णय घेऊ.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT