variable pay work from office esakal
पुणे

Work From Home: आयटी कंपन्यांचे नवे धोरण! variable पे हवा असेल तर एकच अट

Variable Pay: वर्क फ्रॉम ऑफीस नसेल तर ‘व्हेरीएबल पे’ विसरा, ‘वर्क फ्रॉम होम’ बंद करण्याची काय आहेत प्रमुख कारणे?

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २२ : कंपनीत कार्यरत असलेल्या सर्व आयटीयन्सने ऑफिसमध्ये येऊनच काम करावे म्हणून आणखी एक शक्कल लढवली आहे. घरून काम करत असाल तर परिवर्तनीय वेतन (व्हेरीएबल पे) दिले जाणार नाही, असा नियम अनेक कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील अनेकांच्या ‘व्हेरीएबल पे’ला कात्री लावण्यात आली आहे. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाचे कारण देत अनेकांना हे वेतन देण्यात आलेले नव्हते.

(work from home news)

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कंपनीत येऊन काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही विविध कारणे देत अनेक कर्मचारी ‘वर्क फॉर्म होम’ करत होते. मात्र, कर्मचाऱ्यांचे घरून काम करणे कंपन्यांना न परवडणारे ठरत आहे.

तसेच कर्मचारी घरून पूर्ण क्षमेतेने काम करत नाहीत, अशीदेखील अनेक कंपन्यांची भूमिका आहे. त्यामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास भाग पाडण्यासाठी थेट त्यांच्या विविध भत्त्यामध्ये कपात केली जात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करत अनेक आयटीयन्सनी ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनानंतर निर्माण झालेली आर्थिक स्थिती, रशिया-युक्रेन युद्ध, यांमुळे परदेशातून भारतात येणाऱ्या प्रोजेक्टची संख्या कमी झाली होती. त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी आयटी कंपन्यांनी नवनवीन युक्त्या शोधल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी आयटीयन्सचा ‘व्हेरीएबल पे’ १० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता.

व्हेरीएबल पे म्हणजे काय? (what is variable pay?)

कोणताही कर्मचारी कामावर घेताना त्याला ठराविक रकमेचे पॅकेज दिले जाते. त्याला कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) म्हणतात. ही रक्कम जर १० लाख ठरली असेल, तर त्यातील सुमारे आठ लाख रुपयेच (कंपनीनुसार ही रक्कम वेगळी असते) मूळ वेतन म्हणून दिले जातात. तर उर्वरित रक्कम ‘व्हेरीएबल पे’नुसार दिली जाते. कर्मचाऱ्यांचे काम किती समाधानकारक आहे, त्यावर या रकमेतील काही रक्कम त्याला दिली जाते. काही कंपन्यांमध्ये ‘व्हेरीएबल पे’ ‘सीटीसी’चा भाग नसतो. कंपनीनुसार या रकमेचे धोरण वेगवेगळे आहे.

कोरोना सुरू झाल्यापासून मार्च २०२३पर्यंत मी घरून काम करत होतो. त्यानंतर मार्च ते जून २०२३ दरम्यान मी ऑफिसमध्ये जाऊन काम केले. त्यानंतर पुन्हा वर्क फॉर्म होम करत होतो. ज्यांना हवे त्यांना घरून काम करण्याची परवानगी त्यावेळी देण्यात आली होती. मात्र आता मला ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची सूचना करण्यात आली आहे. मी घरून काम करण्याची परवानगी मागितली असता ती देण्यात आली. पण घरून काम केले तर विविध भत्ते मिळणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. ‘व्हेरीएबल पे’चाही त्यात समावेश आहे.
आयटीयन

आयटीयन्सचे ‘वर्क फॉर्म होम’ बंद करण्याची प्रमुख कारणे

  • वर्क फॉर्म होमसाठीच्या सेवा देणे कंपनीला परवडत नाही

  • पूर्ण कर्मचारी ऑफिसमध्ये नसल्याने देखभाल खर्चाचे बिघडलेले गणित

  • कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचे निरीक्षण

  • घरून एका कंपनीचे काम करत असतानाच दुसऱ्या कंपनीचेही काम करत असल्याचा (मूनलाइटिंग) संशय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT