पुणे

आयएएस असल्याचे सांगत सावकारी करणाऱ्या महिलेला अटक

CD

पुणे, ता. २७ : राजमुद्रेचा फोटो व्हॉट्स अॅप डीपीला ठेवून त्यावर आयएएस ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणाऱ्या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. दुप्पट पैसे दिल्यानंतरही अधिक पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी तिने एका महिलेला दिली होती.

रेणुका ईश्वर करनुरे (वय ३२, रा. सिद्धिविनायक सोसायटी, वडकी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पूजा प्रवीण मोरे (३१, रा. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरगुती व्यवसाय करतात. रेणुकाने आपण आयएएस असल्याचे मोरे यांना सांगितले. फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी रेणुका हिच्याकडून सुरुवातीला दरमहा पाच टक्के दराने ६० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन लाख ६८ हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात तीन लाख ४८ हजार ६५० रुपयांचे व्याज फिर्यादी यांनी आरोपीला दिले. दोन लाख ६८ हजार रुपयांपोटी त्यांनी आठ लाख आठ हजार ६५० रुपये दिलेले आहेत. असे असतानाही आणखी चार लाख ५५ हजार ५९८ रुपये देणे बाकी असल्याचे ती म्हणत होती. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी ती देत होती. पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके अधिक तपास करत आहेत.

महिन्याला सहा हजार रुपये दंड
व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाही तर रेणुका ही केवळ दंडाचे सहा हजार रुपये वसुल करत होती. पैसे न दिल्याने तिने फिर्यादीच्या पतीची कार जबरदस्तीने ओढून नेली होती. अडीच लाख रुपये दिल्यानंतर तिने ती परत केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT