पुणे

‘अचूक वीजबिलांसाठी उपाययोजना कराव्यात’

CD

पुणे, ता. २९ : ‘‘पुणे परिमंडलात अचूक वीजबिलांच्या प्रमाणात वाढ झाली असून, सद्यःस्थितीत ९५.४३ टक्के वीजग्राहकांना अचूक बिल देण्यात येत आहे. यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अचूक बिलिंगचे प्रमाण ९७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अचूक बिलिंगमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागात शाखा कार्यालयानिहाय कृती आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात,’’ अशा सूचना मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिल्या.
मीटर रीडिंगचे बिलिंग व फोटो मीटर रीडिंगबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. त्यात पवार यांनी हा आदेश दिला. या वेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत यांच्यासह सर्व ७७ मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापक तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, वित्त व लेखा अधिकारी उपस्थित होते.
पुणे परिमंडलात १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेवून विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे अचूक बिलिंगचे प्रमाण मार्च २०२४ अखेर ९५.४३ टक्क्यांवर गेले आहे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी वीजबिलांमध्ये १.१६ टक्क्यांनी, तर मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फोटोच्या प्रमाणात १.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. वीजमीटरच्या अचूक रीडिंगसाठी पुणे परिमंडलाकडून दैनंदिन निरीक्षण करण्यात येत आहे. तसेच उपविभाग कार्यालयांकडून दरमहा मीटर रीडिंगच्या फोटोची १०० टक्के तपासणी करण्यात येत आहे.
या वेळी पवार म्हणाले,‘‘अचूक मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. अचूक बिलिंगमध्ये सुधारणा होत आहे ही समाधानाची बाब असली तरी प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थानिक उपाययोजनांना आणखी गती दिली पाहिजे. यासाठी संबंधित विभाग व उपविभाग कार्यालयांची जबाबदारी महत्त्वाची आहे. ग्रामीण भागात मागील वर्षाच्या तुलनेत २.७८ टक्क्यांनी अचूक बिलिंग वाढले आहे. तर सरासरी वीजबिलांचे प्रमाणदेखील ३.२० टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र यापुढे आणखी सुधारणेसाठी शाखा कार्यालयस्तरावर कृती आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात. तसेच चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT