पुणे

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुभेच्छांचा वर्षाव

CD

पुणे, ता. १० : घरोघरी पुरणपोळी, आमरस असा पारंपारिक खाद्य पदार्थांची रेलचेल... मुहूर्ताचा योग साधून खरेदी केलेले सोने-चांदी... एवढंच नव्हे छोट्या-मोठ्या वस्तूंची खरेदी... अशा आनंददायी वातावरणात पुणेकरांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी, घर, संपत्ती, वाहन खरेदी करण्याला खास महत्त्व दिले जाते. त्यामुळे मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी अनेकांनी हा मुहूर्त साधला. म्हणूनच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी पहायला मिळाली. सोन्याचे दर तेजीत असले तरी मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवसाचे औचित्य साधून नागरिकांनी गृहप्रवेश केल्याचेही चित्र दिसून येते.
अक्षय तृतीयेच्या दिवसाची सुरुवात ‘प्रत्येक काम होवो पूर्ण...धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन...घरात होवो लक्ष्मीचं आगमन’, ‘नुसतीच नाही सोने-चांदी खरेदी, दानाचंही आहे महत्त्व. या दिवशी अक्षय फळाचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आहे खास’, ‘अक्षय राहो सुख तुमचे...अक्षय राहो प्रेम तुमचे...अक्षय राहो धन तुमचे...,’’ अशा शुभेच्छा देत आणि स्वीकारत झाली. या दिवशी घरात पुरणपोळी, आमरस-पुरी अशा मेजवानीचा बेत केला जातो. त्यामुळे नागरिकांनी आंबे खरेदीही मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून आले.

ैअक्षय मुहूर्तावर पावसाने दिली गारव्याची अनुभूती
दिवसभर जाणवणाऱ्या वैशाख वणव्यानंतर सायंकाळी ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटात शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उन्हाने हैराण झालेल्या शहरवासीयांना अक्षय मुहूर्तावर आलेल्या पावसाने गारव्याची अनुभूती दिली. नातेवाईक, मित्र परिवाराला शुभेच्छा देत, नवीन खरेदी करत आणि स्वादिष्ट मेजवानीचा मनमुराद आस्वाद घेत पुणेकरांनी अक्षय तृतीयेचा सण उत्साहात साजरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT