पुणे

रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटरशिप प्रोग्रॅम

CD

रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटरशिप प्रोग्रॅम
पुणे, ता. १० : रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य, भरपूर पैसे व नाव कमवायची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच आयुष्यभर स्थिर व्यवसाय हवा आहे, अशा सर्वांसाठी रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटरशिप सर्टिफिकेशन प्रोग्रॅम सोमवारपासून सुरू होत आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत किंवा वयाची अट नाही. ३ महिने क्लासरूम तसेच ऑनलाइन व त्यानंतर पुढील ३ महिने प्रात्यक्षिक असे प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. स्थिर व भरपूर पैसे देणाऱ्या करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श आणि परिपूर्ण असे हे प्रशिक्षण असणार आहे. प्रसिद्ध रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क पन्नास हजार रुपये.
संपर्क : ९५०३६५५२७७.
----------------------------------------------------

जर्मन भाषा लेव्हल १ अभ्यासक्रम
युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही जर्मनीची आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि कॉर्पोरेशन हे जर्मन आहेत. भारत ही त्यांची वाढती बाजारपेठ असल्याने जर्मन भाषा अनुवादक, जर्मन दुभाषी आणि जर्मन प्रशिक्षकांना भारतात नेहमीच मागणी होती आणि पुढेही राहणार आहे. जर्मन शिकल्याने रेझ्युमेला वजन प्राप्त होते आणि नोकरीच्या बाजारपेठेतील रोजगार क्षमता वाढते. या सर्व संधींचा लाभ घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. जर्मन भाषेचा ६० तासांचा (लेव्हल ए१) प्रमाणपत्र अभ्यासक्रम १५ मेपासून सुरू होत आहे. एकूण तीन टप्यांमध्ये हा अभ्यासक्रम स्टेप-बाय-स्टेप होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६.
----------------------------------------------------

नॉन व्हेज बिर्याणी ऑनलाइन कार्यशाळा
उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्याची व घरच्या घरी स्वादिष्ट बिर्याणी शिजवण्याची संधी देणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ मे रोजी आयोजित केली आहे. भारतातील सर्वात आवडता आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे बिर्याणी. बिर्याणी तयार करण्याचे शास्त्र, शक्य तितक्या सोप्या मार्गाने कार्यशाळेत शिकवले जाईल. यामध्ये लज्जतदार असे बिर्याणीचे ३ प्रकार, हैद्राबादी दम बिर्याणी, लखनवी बिर्याणी व बॉम्बे बिर्याणी प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येणार आहे. कार्यशाळेत खास घरगुती बिर्याणी मसाला व मॅरीनेशन, तांदूळ किती शिजवावा हे तपशीलवार शिकवले जाईल. कार्यशाळेपूर्वी पीडीएफ नोट्स शेअर केल्या जातील.
संपर्क: ९१४६०३८०३१.
----------------------------------------------------

एआय वापरून बना यूट्यूबर
शिवाजी कचरे यांची उत्तम यूट्यूबर कसे व्हावे व त्यासाठी एआयचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणारी दोन वीकेंडला चालणारी चार दिवसांची कार्यशाळा १८ मेपासून आयोजिली आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत युट्युबद्वारे कमाई कशी करता येते याबद्दल संपूर्ण माहिती, स्वत:चे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये एआयचा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती एआय साधने वापरावीत याचे उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२.


वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT