Pune Loksabha sakal
पुणे

Pune Loksabha : प्रचाराला बूस्टर देण्यासाठी कॉंग्रेसचे आठ आमदार सक्रिय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील निवडणूक प्रचाराचा बूस्टर देण्यासाठी कॉंग्रेसने विदर्भ व अन्य जिल्ह्यांतील आठ आमदारांची फौज रिंगणात उतरविली आहे. त्यांना विधानसभानिहाय जबाबदारी दिली असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मतदान वाढविण्यावर त्यांचा भर असेल.
कॉंग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि सुनील ठाकूर यांना पक्षाने पुणे लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

तसेच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघासाठी विकास ठाकरे (नागपूर), पर्वतीसाठी अमित झनक (वाशीम), शिवाजीनगरसाठी धीरज भिंगाडे (बुलडाणा), कसब्यासाठी सुभाष धोटे (चंद्रपूर), कोथरूडसाठी अभिजित वंजारी (नागपूर) आणि कॅंटोन्मेंटसाठी राजू आवळे (कोल्हापूर) हे शहरात कार्यरत आहेत.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यापासून ही नेतेमंडळी पुण्यात आली आहेत. ठाकूर आणि केदार हे आठ दिवसांपासून तर, आठही आमदार गेल्या चार दिवसांपासून कार्यरत आहेत. या सर्व नेत्यांना निवडणुकांचा विशेष अनुभव असून शहरात स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हक्काच्या मतदारांपर्यंत पोचून त्यांच्याकडून मतदान करवून घेण्याची त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली आहे.

विविध जाती समूहांच्या मेळाव्यांनाही ही नेते मंडळी उपस्थित राहत आहेत. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सक्रिय झाले आहेत, अशी माहिती पुणे लोकसभेचे प्रचारप्रमुख मोहन जोशी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT