पुणे

अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह; नवजात अर्भकाच्या मृत्यू

CD

पुणे, ता. ११ : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलगी प्रसूत झाल्यानंतर नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. मुलीने याबाबत तक्रार दिल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तिची आई, पती, सासरा आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या आईसह पती, सासरा, दीर आणि एका नातेवाईकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो), बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीचा वर्षभरापूर्वी एका तरुणाशी विवाह झाला होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आईसह सासरकडील मंडळींना होती. अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून देण्यात आला. मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असताना प्रसूती झाली. प्रसूती दरम्यान नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

अत्याचारप्रकरणी तरुण अटकेत
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली. याबाबत एका अल्पवयीन मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रोहन राजेंद्र गायकवाड (वय १९, रा. भेकराईनगर, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी रोहनने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT