Pune Lok Sabha Election vote polling 2024 Sakal
पुणे

‘ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, तुझे है पुकारा’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : परदेशातील नोकरी कितीही मोठी असो मायदेशाची ओढ कायमच असते. आम्ही वर्षभरातील सण-उत्सवांचा अंदाज घेऊन सुटीचे नियोजन करतो. मतदान तर आपले नैतिक कर्तव्य असून, त्यासाठी नक्कीच वेळ काढायला हवा, अशी भावना परदेशातून फक्त मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

हे ऐकून ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा, तुझे है पुकारा’...या ओळींची आठवण होते. नोकरीबरोबरच उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी परदेशात असलेल्या पुणेकरांची संख्या मोठी आहे.

बहुतेकांनी मतदानाच्या तारखा घोषित होताच स्वदेशवारीचे नियोजन केले होते. ज्यांना फार दिवस थांबणे शक्य नाही अशांनी मतदानानंतर लगेचच परतीच्या प्रवासासाठी विमानतळ गाठले होते. विशेष म्हणजे असे कर्तव्य बजावणाऱ्यांमध्ये युवा वर्गाचे सर्वाधिक योगदान होते. त्यातीलच काही निवडक प्रतिक्रिया...

पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड मतदार संघात माझे मतदान केले. सध्या मी अमेरिकेत फोटोग्राफी करत असून मूळची कोथरूडची रहिवासी आहे. मतदानाची तारीख जाहीर झाल्यावर एक महिन्यापूर्वीच भारतात येण्याची तयारी केली. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील मतदार असल्याने मतदानाचा हक्क बजावणे माझे कर्तव्य आहे.
- मृणाल जोशी-सराफ

लंडन येथे कामानिमित्त स्थायिक झाले असून मूळची कोथरूडची रहिवासी आहे. त्यामुळे माझे मतदान पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड मतदार संघात आहे. निवडणूक घोषित झाल्यावर लगेचच येण्याची तयारी सुरू केली होती. १३ तारखेला मतदानाचा हक्क बजावता येईल, हे ठरवूनच मी या वेळेस सुट्टीचे नियोजन केले होते. कारण २०१७ नंतर जवळपास सात वर्षांनी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी खास भारतात आले.
- पल्लवी अमराळे-साष्टे

आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पूर्ण करण्यास मी वचनबद्ध आहे. त्यासाठी भारतातील दोन-तीन कामांच्या तारखा जुळवून कालच म्हणजे १२ मे रोजी संध्याकाळी अमेरिकेतून पुण्यात पोहोचलो. मतदान हा विशेषाधिकारच आपल्याला लोकशाहीत सक्रिय सहभागी राहण्याची संधी देतो. मतदान करून, मी न केवळ आपला अधिकार वापरला पण या प्रक्रियेसाठी लागण्याऱ्या प्रचंड नियोजनाप्रती व या प्रक्रियेप्रती माझा आदर व्यक्त केला. जगातली सर्वांत मोठी लोकशाही अशी आपल्या देशाची ओळख व ही व्यवस्थाच आपल्याला आपल्या भविष्याला आकार देण्याची संधी देते.
- अनीश क्षीरसागर, पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात मतदानाची मूलभूत प्रक्रिया पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवून मी भारतात आलो होतो. सकाळी लवकर मतदान करून कझाकस्तान येथे परत जाण्यासाठी थेट विमानतळ गाठले.
- प्राइस शिवरकर, कझाकस्तान

हाती निराशा...
एकीकडे मतदानाचा हक्क बजावता आल्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तर दुसरीकडे मतदार यादीत नाव नसल्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली. याचा फटका परदेशातून आलेल्यांनाही बसला. श्रीयश कुलकर्णी हे मतदानासाठी सिंगापूरहून आले होते. पण त्यांचे मतदार यादीत नाव नसल्याने हक्क बजावता आलेला नाही. छायाचित्र जुने आहे म्हणून नाव मतदार यादीतून काढून टाकण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT