पुणे

लोकशाहीच्या उत्सवात ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग!

CD

पुणे, ता. १३ ः एरव्ही घरातील आरामखुर्चीत बसून, बातम्या पाहण्यात तसेच वर्तमानपत्र वाचण्यात दंग असलेली आजी-आजोबांची पिढी आज मात्र आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी बाहेर पडली. कोणी रिक्षात बसून, तर कोणी वॉकर, काठी घेऊन मतदान केंद्र गाठले. सकाळच्या सत्रात शहरातील विविध मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झाली होती. कोणी गेल्या ७० वर्षांपासून मतदान करीत होते. तर कोणी ६२ वर्षांपासून. वय वाढले असले, तरीही ज्येष्ठांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा होता. थकलेल्या डोळ्यात उद्याच्या उज्ज्वल भारताची स्वप्ने दाटलेली होती.
पुण्यातील विविध मतदान केंद्रावर सोमवारी (ता. १३) सकाळी ७ ते १० व दुपारी ५ ते ६ या वेळेत ज्येष्ठांचे अधिक मतदान झाले. दुपारी उन्हाची तीव्रता वाढल्याने ज्येष्ठांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. ज्येष्ठांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेयरची सोय करण्यात आली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना थेट ईव्हीएमपर्यंत पोहचता आले. काही केंद्रावर उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे, याकरिता मंडप टाकण्यात आले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून मी मतदान करते. लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकानी सहभागी होणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे. मतदारांनी हा सुटीचा दिवस न समजता, आपल्या कर्तव्याचा दिवस आहे, असे समजून यात सहभागी झाले पाहिजे.
पार्वती वाळूंजकर : (वय ८५ )

पहिल्या मतदानाच्या जो उत्साह होता, तो उत्साह आजही टिकून आहे. हा लोकशाहीचा उत्सव आहेच. शिवाय या निवडणुकीतून देशाचे भवितव्य देखील ठरविले जाते. तेव्हा सर्वानी जागरूकपणे मतदान केले पाहिजे. मतदानाद्वारे आपण केवळ उमेदवारालाच नाही, तर आपल्या भविष्याची निवड करीत असतो.
वसंतराव वाळूंजकर : (वय ९२)

मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून ते आजतागायत न चुकता मतदानाचा हक्क बजावीत आहे. मतदानात कधीच खंड पडू दिला नाही. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्वांनीच आवर्जून मतदान करायला हवे.
वसंत देशपांडे : (वय ९३)

मी पूर्वी कसबापेठेत राहत होतो. आता बिबवेवाडी येथे राहायला गेलो. असे असले, तरीही माझे मतदान कसब्यातच आहे. गेल्या ६२ वर्षांपासून मी नियमितपणे मतदान करीत आहे. कोणतेही अडचण असली, तरीही बाजूला सारून हे राष्ट्राचे कार्य आहे, असे समजूनच न चुकता मतदान केले आहे. आता वयाची ८५ गाठली. मात्र तरुणपणी जो उत्साह होता. तोच उत्साह आजही टिकून आहे.
नारायण उत्तरेश्वर : वय (८५ )

वयामुळे मला चालता येत नसल्याने व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली. मला तरुणांना आवाहन करायचे की, तुम्ही देखील मोठ्या संख्येने मतदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हा. लोकसभेची निवडणूक देशाच्या भविष्याला कलाटणी देणारी निवडणूक आहे. तेव्हा जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे.
सुशीलाबाई लकडे : (वय ९४) :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT