पुणे

लैंगिक अत्याचारप्रकरणी एका संशयिताला अटक

CD

पुणे, ता. १४ : तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरातील एका संशयिताला अटक केली आहे.

प्रवीण बंब (वय ४५, रा. मार्केट यार्ड रस्ता) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला जबरदस्तीने खडकवासला परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिला मारहाण करून लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर करीत आहेत.

----
जादूटोण्याची भीती दाखवून
महिलेकडून उकळली खंडणी

पुणे, ता. १४ : जादूटोणा केल्याची भीती दाखवून एका महिलेकडून खंडणी उकळल्याची घटना वानवडी परिसरात घडली. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्ण नारायण तिवारी (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला ‘तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे, काळी जादू दूर करण्यासाठी पूजा, विधी करावा लागेल,’ असे सांगितले. आरोपी महिलेच्या घरी गेल्यानंतर त्याने महिलेसह तिच्या लहान मुलीला सरबत दिले. महिलेला गुंगी आल्यानंतर आरोपीने महिलेची मोबाईलवर छायाचित्रे काढली. त्यानंतर छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपीने महिलेकडून पैसे उकळले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.
---

-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT