Pune Porsche Accident Sakal
पुणे

Pune Porsche Accident : अग्रवाल बाप-लेकाकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबाने त्यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे, मात्र ते तपासात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) न्यायालयात दिली.

अल्पवयीन मुलाने केलेला अपघाताचा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी मोटारचालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवल्या प्रकरणी आजोबा सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि वडील तसेच बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

त्यातील सुरेंद्रकुमारच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. विशालला या गुन्ह्यात सोमवारी (ता. २७) रात्री अटक करण्यात आली. या दोघांना मंगळवारी एकाच वेळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी तपासाबाबत माहिती न्यायालयाला दिली. या प्रकरणी मोटारचालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाईल आरोपींकडेच
आरोपींनी हेरीक्रुब यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली बीएमडब्ल्यू मोटार जप्त करण्यात आली आहे. त्यांनी फिर्यादीचा मोबाईल धमकावून काढून घेतला होता. मोबार्इलबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन मोबार्इल त्यांच्याकडून जप्त करायचा आहे, अशी माहिती तपास अधिकारी तसेच खंडणी विरोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयाला दिली.

३१ मेपर्यंत पोलिस कोठडी
गुन्ह्याची व्याप्ती पाहता सखोल तपास होणे गरजेचे आहे. विशालला सोमवारी अटक करण्यात आली आहे. दोघांकडे एकत्रित तपास करायचा आहे. आरोपी पोलिसांना सहकार्य करीत नसल्याने पुढील तपासासाठी त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

काय आहे फिर्याद ?
मोटारचालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब यांच्या फिर्यादीतील मुख्य मुद्दे
१) माझ्या घरी परत जाण्यासाठी येरवडा पोलिस ठाण्यातून बाहेर पडताच सुरेंद्रकुमार सरांनी बोलावून घेतले
२) मला धमकी देऊन माझ्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडील बीएमडब्ल्यू गाडीमध्ये बसवून ब्रह्मा सनसिटी येथील त्यांच्या बंगल्यात नेले
३) सुरेंद्रकुमार व विशाल यांनी संगनमत करून मला धमकावून माझा मोबाईल फोन काढून घेतला
४) मोबाईल त्यांच्या बंगल्यात बेकायदेशीरपणे लपवून ठेवण्याच्या उद्देशाने मला डांबून ठेवले
५) मुलाने केलेला गुन्हा स्वतःवर घे व त्या बाबतीत कोणाशी बोललास तर याद राख अशी धमकी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT