पुणे

सायबर चोरट्यांकडून ३० लाखांची फसवणूक

CD

पुणे, ता. १ : सायबर चोरट्यांनी विविध आमिषे दाखवून तिघांची ३० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत चंदननगर, चतु:शृंगी आणि सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव शेरी परिसरातील एका २४ वर्षीय तरुणाने चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याबाबत फिर्याद दिली आहे. विमानतळावर तुमच्या नावाने पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाला धमकावले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगून तरुणाला ऑनलाइन पद्धतीने पाच लाख २० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने मुंढवा परिसरातील एका ४० वर्षीय महिलेची सायबर चोरट्यांनी तीन लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी एका तरुणीची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणीने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार तपास करत आहेत.
बाणेर परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १० लाख १२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT