पुणे

विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती लांबली

CD

पुणे, ता. ५ : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती आगामी विधानसभा निवडणुकीमुळे लांबण्याचीच चिन्हे आहेत. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनी या पदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारण्याची विनंती नाकारली. त्यामुळे हे पद रिक्त आहे.
डॉ. दीक्षित यांची २७ मे २०२१ रोजी अध्यक्ष आणि प्रमुख संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ २६ मे २०२४ रोजी समाप्त झाला. विधानसभा निवडणूक येत्या तीन ते चार महिन्यांतच होणार आहे. निवडणुकीनंतर नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतरच नवीन अध्यक्षांची नियुक्ती होईल, असे सूत्रांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.
डॉ. दीक्षित यांच्या नियुक्तीपूर्वी मंडळाच्या कामकाजात गोंधळ निर्माण झाला होता. विश्वकोशातील अनेक नोंदींमध्ये चुका झाल्या होत्या. मात्र डॉ. दीक्षित यांनी कामाच्या पद्धतीला शिस्त लावली. त्यामुळे विश्वकोशाची घडी पूर्ववत बसली. मराठी भाषा विभागाच्या प्रशासनाने तसेच अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोंडीला कंटाळून त्यांनी गेल्या वर्षी राजीनामाही दिला होता. मात्र मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. दीक्षित यांनी आपला राजीनामा परत घेतला.
डॉ. दीक्षित यांच्या कार्यकाळात सुमारे १३५० नव्या नोंदींची भर विश्वकोशात पडली. सध्या विश्वकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीचे काम, ऑलिंपिक कोश, बालकोश आदी प्रकल्पांचाही शुभारंभ झाला आहे. हे प्रकल्प योग्य पद्धतीने आणि गतीने पुढे नेण्याचे आव्हान नव्या अध्यक्षांसमोर असेल.
----
काम सुरू राहणार; पण प्रसिद्धी नाही
डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले की, अध्यक्षपद रिक्त राहणार असले तरी मंडळाचे काम सुरू राहणार आहे. मंडळाच्या नियमांनुसार नोंदींचे काम मंडळाचे संपादक करीत असतात. नोंदी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी अध्यक्षांची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीपर्यंत नव्या नोंदी संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ शकणार नाहीत.’’
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT