CBSE Board sakal
पुणे

CBSE Board : सीबीएसई ११ वी, १२ वीच्या परीक्षा पद्धतीत होणार बदल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमधून आता अभ्यासक्रमातील संकल्पनांबाबत विद्यार्थ्यांमध्ये कितपत स्पष्टता आली आहे, हे तपासण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमधून आता अभ्यासक्रमातील संकल्पनांबाबत विद्यार्थ्यांमध्ये कितपत स्पष्टता आली आहे, हे तपासण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केला जाणार असल्याचे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईने यापूर्वीच बदल स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता विद्यार्थ्यांना यावी आणि त्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी, यावर भर देणारे प्रश्न अधिक विचारले जाणार आहेत. याप्रकारे प्रश्नपत्रिकेत बदल करण्यास सीबीएसईने सुरूवात केली आहे. त्यातील बदल शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून होणार आहेत.

त्यादृष्टीने प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातही बदल केला जाणार आहे. या अंतर्गत अकरावी-बारावीच्या परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्न वाढविण्यात येतील. त्याचप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न, स्रोत आधारित एकत्रित प्रश्न आणि अन्य प्रश्नांचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी वाढविणार आहेत तर लघु आणि दीर्घ उत्तरे लिहिणे अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात येईल, असे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (२०२०) अनुषंगाने सीबीएसईने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळांमध्ये क्षमतेवर आधारित शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यता, क्रिटिकल आणि सिस्टिम थिंकिंग निर्माण व्हावी, त्यादृष्टीने बदल करण्यात येत आहेत. अकरावी-बारावीच्या परीक्षेत वास्तविक जीवनातील संकल्पनांच्या वापराचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेवर आधारित प्रश्नांची टक्केवारी वाढविणार आहे.
- जोसेफ इमॅन्युअल,
संचालक (शैक्षणिक), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT