पुणे

फुरसुंगीत ‘बांधकामांतील’ अडथळा दूर

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २७ : फुरसुंगी येथील नवीन कालव्याच्या सुमारे ३२ हजार चौरस मीटर, म्हणजे सुमारे साडेतीन लाख चौरस फूट जागेचे रेकॉर्ड अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान अपडेट झालेल्या रेकॉर्डची माहिती जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविली आहे. त्यामुळे बांधकामांना परवानगी देताना महापालिकेला येणारी अडचण दूर होणार आहे.
महापालिकेकडून फुरसुंगी येथील २६१ हेक्टरवरील ‘टीपी स्कीम’ राबविण्याचा इरादा मार्च २०१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता. ‘एमआरटीपी ॲक्ट’नुसार दोन वर्षांत या योजनेचे प्रारूप जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळ आणि लॉकडाऊन यामुळे योजना राबविण्यास महापालिकेने राज्य सरकारकडून मुदतवाढ घेतली. दरम्यान, १४ मार्च २०२२ रोजी महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आली. मुदत संपण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असताना फुरसुंगी ‘टीपी स्कीम’च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. त्याला गेल्या वर्षी १० मार्च रोजी झालेल्या सर्वसधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबरच ‘टीपी स्कीम’मधील क्षेत्रफळात दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली. २१ मार्च २०२२मध्ये त्यांचे प्रारूप जाहीर करण्यात आले. त्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेऊन तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार होता.
या दरम्यान फुरसुंगी येथे नवीन कालव्यासाठी जलसंपदा विभागाकडून जागा ताब्यात घेण्यात आली असली, तरी कागदोपत्री मात्र जागा खासगी मालकांच्या ताब्यात असल्याचे दिसून आले. सुमारे ३२ हजार चौरस मीटर एवढी ही जागा आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेकडून जलसंपदा विभागाला पत्र देऊन रेकॉर्ड अपडेट करावे आणि त्याबाबतची सर्व कागदपत्रे महापालिकेकडे सादर करावीत, अशी विनंती केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

विशेष पथकाकडून तपासणी
जलसंपदा विभागाकडून रेकॉर्ड अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी विशेष पथक स्थापन करून भूसंपादनाचे ॲवॉर्ड तपासणीचे काम हाती घेण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर जे रेकॉर्ड अपडेट झाले आहे, त्यांची माहिती जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पाठविण्यात आली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

जागा जलसंपदा विभागाची
फुरसुंगीमधून दोन कालवे वाहतात. एक कालवा ब्रिटिशकालीन असून ते १८७७ मध्ये बांधण्यात आला आहे. तर दुसरा नवीन कालवा हा १९६०मध्ये बांधण्यात आला आहे. कालवा बांधताना भविष्यात देखभाल-दुरुस्तीसह विविध आवश्‍यक ती कामे करणे, सोईचे जावे, यासाठी या जागेचे भूसंपादन करण्यात आले होते. नवीन कालव्यासाठी भूसंपादन प्रत्यक्षात झाले. परंतु कागदपत्रांमध्ये तसे बदल करून जलसंपदा विभागाच्या नावावर ती जागा झालेली नाही. त्यामुळे जागेच्या सातबारा उताऱ्यावर खासगी मालकाचे नाव असले, तरी प्रत्यक्षात ती जागा जलसंपदा विभागाची आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले


फुरसुंगी येथील नवीन कालव्याच्या जागेसंदर्भात महापालिकेकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार रेकॉर्ड अपडेट करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जे रेकॉर्ड अपडेट झाले आहे, ते महापालिकेकडे माहितीसाठी पाठविण्यात आले आहे.
- श्‍वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Property Rights: खाजगी मालमत्ताधारकांच्या हक्कांना मिळाला मजबूत आधार ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT