CET Exam News sakal
पुणे

CET Exam News : ‘नीट’ देणाऱ्यांना ‘सीईटी’ची तारीख बदलण्याची संधी

देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाच मे रोजी ‘नीट-यूजी’ परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळपास दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाच मे रोजी ‘नीट-यूजी’ परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळपास दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे ‘नीट-यूजी’ आणि ‘एमएचटी-सीईटी २०२४’ (पीसीएम) देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सीईटी’ (पीसीएम) परीक्षेची तारीख बदलून घेण्याची संधी मिळणार आहे, असे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ‘नीट-यूजी २०२४’ परीक्षेसाठी देशातील जवळपास १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी ‘नीट’सह राज्यात होणारी ‘सीईटी’ परीक्षाही देतात. या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पाच मे रोजी होणाऱ्या ‘सीईटी’च्या तारखांमध्ये बदल केला आहे. नव्या बदलानुसार सीईटी सेलने सुधारित वेळापत्रकही यापूर्वीच जाहीर केले आहे. ‘सीईटी’ (पीसीएम) पाच मे रोजी होणार नाही; तरीही ज्यांना प्रवेशपत्र प्राप्त झाल्यानंतर ‘सीईटी’ (पीसीएम) परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणासाठी बदलणे आवश्यक वाटते, अशा विद्यार्थ्यांना तारीख बदलण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी ‘नीट-यूजी २०२४’ परीक्षेच्या प्रवेश पत्रासह mhtcetpcm2024@gmail.com या ई-मेलवर आपला विनंती अर्ज करावा, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोट्यावधी रुपयांचं चरस जप्त

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने कचरा, कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT