पुणे

कोयत्याने वार करणाऱ्यांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

CD

पुणे, ता. ८ : खंडणी न दिल्याच्या रागातून गॅरेज चालक बंधू आणि दोन महिलांवर कोयत्याने वार करून वाहनांची तोडफोड करत दहशत माजविल्याप्रकरणी सहा जणांना मोक्का न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ लाख १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा निकाल दिला.

बाबू ऊर्फ बाब्या मोहन पिल्ले, अविनाश ऊर्फ तन्या सुरेश वानखेडे, राहुल ऊर्फ भय्या प्रकाश तायडे, श्रीनिवास ऊर्फ शिन्नू चिन्या ऊर्फ गणेश पिल्ले, साहिल राजेश पिल्ले आणि राजू ऊर्फ नकट्या प्रभू मुन्नुस्वामी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात लितेश टिंकू दास (वय २७, रा. खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. २१ जुलै २०१६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास खडकीतील मुळा रोड येथील वस्तीत हा प्रकार घडला होता.

खडकी विभागाचे तत्कालीन साहाय्यक पोलिस आयुक्त वसंत तांबे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी या खटल्यात १७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये जखमी व्यक्ती, पोलिस अधिकारी आणि पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्त्वाच्या निवाड्यांचे दाखले दिले. त्या आधारे न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास नऊ महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT