पुणे

किरकोळ वादातून जादूटोण्याचा प्रकार

CD

पुणे, ता. ९ : सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला वैयक्तिक काम सांगितल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून कोंढवा भागात सोसायटीच्या चिटणीसासह मुलाने जादुटोण्याचा प्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सोसायटीतील रहिवाशाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार चिटणीसासह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोंढव्यातील साळुंखे विहार रस्त्यावरील सह्याद्री पार्कमधील पिकासो पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. चिटणीस राजकुमार जोशी आणि मुलगा अंकुर अशी संशयितांची नावे आहेत. जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये त्यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रूपेश अग्रवाल यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश आणि त्यांचे वडील १४ मार्च रोजी सोसायटीतून निघाले होते. त्यावेळी सोसायटीतील सुरक्षारक्षक जागेवर नव्हता. त्यामुळे अग्रवाल हे जोशी यांच्याकडे गेले. त्यांनी सुरक्षारक्षकाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याला आपली गाडी धुण्यासाठी पाठविल्याचे जोशी यांनी सांगितले. त्यावर अग्रवाल यांनी, ‘सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला वैयक्तिक काम का सांगता,’ अशी विचारणा केली. त्यावरून वाद झाला. जोशी यांनी अग्रवाल पिता-पुत्राला शिवीगाळ केली. अग्रवाल यांच्याविरुद्ध जोशी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
---
‘लिंबू ठेवले, काळी बाहुली जाळली’
‘जोशी यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लिंबू ठेवले. त्यांनी काळी बाहुली जाळून धमकावले. त्यांनी असे अघोरी कृत्य केल्याने आमचे कुटुंबीय घाबरले. जोशी यांनी आपला मोठा भाऊ राकेश आणि मामा किशनचंद अग्रवाल यांचा पाठलाग करून दहशत निर्माण केली. यामुळे राकेश यांना हृदयविकाराचा झटका आला,’ असे अग्रवाल यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT