पुणे

सहप्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी मोटारचालक मित्रावर गुन्हा

CD

पुणे, ता. ९ : भरधाव मोटार झाडावर आदळून सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना १५ मे मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास लोहगाव परिसरात घडली होती. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अरविंद यादव (रा. खरात कॅपिटल बिल्डींग, लोहगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी तेजस किसन परदेशी (वय ३९, रा. खरात कॅपिटल बिल्डींग, लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आँचल अरविंद यादव (वय २२) यांनी याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अरविंद यादव आणि तेजस परदेशी मित्र होते. दोघेजण स्नेहित कांबळे याची मोटार घेऊन १५ मे रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी लोहगावहून येरवड्याकडे निघाले होते. त्यावेळी लोहगाव येथील संजय पार्क कॉर्नर परिसरात मोटारचालक तेजस याचे नियंत्रण सुटल्याने मोटार झाडावर आदळली. सहप्रवासी अरविंद गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मोटारचालक तेजस याच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. पोटे तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT