पुणे

यशाला गवसणी घालण्यासाठी मेहनत गरजेची : सोलापूरकर

CD

पुणे, ता. १० : ‘‘तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी कष्ट करावेच लागते. यशाला गवसणी घालण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही. आयुष्यात तुमचे कर्तव्य मोठे झाले, तरच तुम्हाला बळ देणाऱ्या तुमच्या संस्थेचेही नाव मोठे होईल,’’ अशा शब्दांत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (एनएडब्लूपीसी) या संस्थेतील दहावी व बारावीच्या परिक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेत्री जयमाला इनामदार, केशवसृष्टीच्या सदस्या डॉ. अलका मांडके, रश्‍मी भातखळकर, लिज्जत पापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख, विश्‍वस्त देवता अंदुरे-देशमुख उपस्थित होते. सोलापूरकर व इनामदार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेत शिक्षण पूर्ण करून बॅंकेत नोकरीस लागलेल्या श्रीशैल बिराजदार याचाही सन्मान करण्यात आला.

सोलापूरकर म्हणाले, राहुल देशमुख हे स्वतः अडचणींतून मार्ग काढत यशापर्यंत पोचले आहेत. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठे सामाजिक काम उभे केले आहे. त्याचा दृष्टिहीन विद्यार्थी लाभ घेत आहेत. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश मिळविणे ही आनंदाची बाब आहे. मात्र यश मिळविण्यासाठी कष्ट व मेहनतीशिवाय पर्याय नाही.’’ इनामदार यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दरम्यान, सोलापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT