पुणे

सैनिकी वसतिगृहासाठी कंत्राटी कर्मचारी भरती

CD

पुणे, ता. ६ : पुणे शहरातील पर्वती व नवी पेठेतील सैनिकी मुलांच्या-मुलींच्या वसतीगृहाकरिता अशासकीय कर्मचाऱ्यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अन्य नागरिकांना येत्या २० जूनपर्यंत संबंधित वसतिगृहात अर्ज करता येणार आहेत.
पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधिक्षकांची (पुरुष) ३, स्वयंपाकी (महिला) ८, सफाई कर्मचारी ३, माळी १ (पुरुष), पहारेकरी १ (पुरुष) आदी रिक्त पदे भरली जाणार आहेत. याशिवाय नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षिका ३, स्वयंपाकी (महिला) ७, सफाई कर्मचारी २ (महिला), माळी १ (महिला किंवा पुरुष) आणि पहारेकरी १ (पुरुष) आदी रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या कंत्राटी कर्मचारी भरतीच्या अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल यांच्याशी ७०२०४१०९५४ या मोबाईल क्रमांकावर आणि वसतिगृह अधीक्षिका मंगला कांबळे यांच्याशी ९५१८३७४८६३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (निवृत्त.) यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT