पुणे

अग्रवाल दांपत्यासह मकानदारच्या कोठडीत वाढ

CD

पुणे, ता. १० : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांसह व अश्‍पाक मकानदारच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अश्‍पाक मकानदार याने कोणाच्या सांगण्यावरून विशाल अग्रवाल यास मदत केली, याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती.
अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल आणि अश्‍पाक मकानदार यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांनी मुलाच्या रक्ताचा नमुना हा महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचा दाट संशय आहे. हा पुरावा कसा व कोणाच्या सांगण्यावरून नष्ट केला, याबाबत तपास करायचा आहे. अश्‍पाकने कोणाच्या सांगण्यावरून अग्रवाल दांपत्याला मदत केली, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांनी केली. यु. एम. मुधोळकर यांच्या कोर्टाने विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, अश्‍पाक मकानदार यांची पोलिस कोठडी १४ जूनपर्यंत वाढविली आहे.
गुन्ह्यातील साक्षीदारांकडे केलेल्या तपासात आरोपी विशाल अग्रवाल, अश्‍पाक मकानदार, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिघांनाही पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केली. मात्र, अग्रवाल यांचे वकील प्रशांत पाटील व मकानदार यांचे वकील आर. एल. धापटे यांनी त्याला विरोध केला. विशाल अग्रवाल हे २१ मेपासून एकाच खटल्यात पोलिस कोठडीत आहेत. एकाच गुन्ह्यासाठी तीन वेगवेगळे एफआयआर पोलिसांनी केले आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तिघांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT