पुणे

गणावेशापेक्षा शिक्षा महत्त्वाची - सीईओ सुब्रत पाल

CD

गणावेशापेक्षा शिक्षण महत्त्वाचे
कँटोन्मेंट बोर्डाचे सीईओ पाल यांचे उत्तर
कँटोन्मेंट, ता. १८ : शिक्षण महत्त्वाचे असून गणवेश हा मुद्दा ठरू शकत नाही. पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या शाळांत उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. शिक्षक ही चांगले आहेत. कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र बोर्डाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने आम्ही सध्या विद्यार्थ्यांना गणवेश देऊ शकत नाही, असे उत्तर बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी दिले.
गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून बोर्ड दहा शाळा चालविते. काही शाळांची अवस्था मनपाच्या तुलनेत दयनीय आहे. बोर्डाकडे निधी नसल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुमारे पाच हजार विद्यार्थी गणावेशापासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना जुना गणवेश घालावा लागतो. अनेकांना जुना गणवेश बसत नसल्याने मिळत्याजुळत्या रंगांचे कपडे घालून शाळेत जावे लागते.
अनेक पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुले वाढत्या वयाची असतात. गणवेश घट्ट होत असल्याने उसवितात. अनेक वेळा शिलाई केल्याने फाटतात. आम्हाला कष्टाची कामे करावी लागतात. आर्थिक मर्यादांमुळे गणवेश घेता येत नाहीत.
याबाबत विचारले असता पाल म्हणाले की, मनपा हद्दीतील सुमारे ६० टक्के विद्यार्थी आमच्या शाळांत येतात. मनपाच्या शाळेत सर्व सुविधा उपलब्ध असतानाही बोर्डाच्या शाळेत प्रवेशासाठी पालक आमच्याकडे शिफारस करतात. येथील शिक्षण पद्धती चांगली असल्यानेच अनेकांची धाव आमच्या शाळांकडे असते.
वंचित बहुजनचे निवेदन
दरम्यान, विद्यार्थांना गणवेश मिळावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, सचिव स्वनील वाघमारे, महासचिव सुनील धेंडे, उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, संघटक रफिक भाई शेख आदींनी बोर्ड कार्यालयात पाल यांना निवेदन दिले.

फोटो ओळ : पुणे कँटोन्मेंट बोर्ड परिसरातील रवींद्रनाथ टागोर शाळेतील विद्यार्थी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT